शेतकरी कन्या कु माहेश्वरी महादेव शिंदे हिची पोलीस भरतीत निवड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 10, 2024

शेतकरी कन्या कु माहेश्वरी महादेव शिंदे हिची पोलीस भरतीत निवड

शेतकरी कन्या कु माहेश्वरी महादेव शिंदे हिची पोलीस भरतीत निवड 


बचेरी, (कटूसत्य वृत्त ):-ग्रामीण भागातील अतिशय काबाड कष्ट करणाऱ्या शेतकरी कुटुंबातील जिद्दी कन्या माहेश्वरी महादेव शिंदे हिची महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये पोलीस भरती झाली आहे.बारामती येथील पोलीस अकॅडेमी मध्ये तिने गेली 5 वर्षे अपार मेहनत घेतली आहे. त्याचबरोबर तिने पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.तिचे वडील महादेव शिंदे हे रिक्षा चालवतात व रात्रंदिवस कष्ट करून मुलांचा शिक्षणाचा खर्च भागवतात.

आई  सौ विद्या शिंदे व छोटा भाऊ शेळ्या मेंढ्या या व्यवसायाबरोबरच पिलीव या गावी बाळूमामा वडापाव सेंटर व हॉटेल चालवून कुटुंबाला आधार देत आहेत. ती कै मच्छिन्द्र मामा खुर्द वाचनालायची सभासद असून वाचनालयातील स्पर्धा परीक्षा पोलीस भरती पुस्तकांचा लाभ झाला असे तिने सांगितले. महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये  पोलीस म्हणून निवड झालेबद्दल वाचनालयाचे अध्यक्ष प्रा सदाशिव शिंदे, सोसायटी व्हाईस चेअरमन व तंटामुक्ती उपाध्यक्ष  हैबतकुमार शिंदे यांनी तसेच पुण्यश्लोक गणेशोत्सव मंडळ,  अंबामाता महिला बचतगट, शिंदे परिवारातील सर्व सदस्य, नातेवाईक, ग्रामपंचायत, स्वयंसेवी संस्था, ग्रामस्थ, मित्रपरिवार यांनी अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages