केंद्रीय शिक्षणमंत्र्यानी तात्काळ राजीनामा द्यावा, युवा महासंघाने केली मागणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 10, 2024

केंद्रीय शिक्षणमंत्र्यानी तात्काळ राजीनामा द्यावा, युवा महासंघाने केली मागणी

केंद्रीय शिक्षणमंत्र्यानी तात्काळ राजीनामा द्यावा, युवा महासंघाने केली मागणी 


प्रति

मा.जिल्हाधिकारी 

जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर. 

यांना सविनय सादर.....

विषय : NEET, UGC-NET मध्ये झालेला भ्रष्टाचार आणि CSIR-NET, NEET-PG या परीक्षेत चाललेला गोंधळ याबाबत.

महोदय,

उपरोक्त विषयी निवेदन देण्यात येत  

2024 च्या NEET-UG परीक्षेचा पेपर परीक्षेच्या एक दिवस आधी पटना, बिहारमध्ये पेपर फुटला.5 मे 2024 रोजी म्हणजे परीक्षेच्या दिवशी, पाटणा येथील शास्त्री नगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पेपर फोड्या टोळीने अनेक उमेदवारांकडून कथितपणे ₹30 ते ₹50 लाख आकारले, त्यांना प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या, त्या NEET-UG च्या आहेत, असा दावा केला आहे, एक दिवस अगोदर मेमोरीझेशनसाठी. पेपरफुटीप्रकरणी पोलिसांनी अनेक संशयितांना अटक केली आहे.  22 जून रोजी, NTA प्रमुख, सुबोध कुमार सिंग यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आले. शिक्षण मंत्रालयाने पेपर फुटी प्रकरणी  संबंधित प्रकरण केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) कडे सोपवले .

की, 5  जून रोजी लागलेल्या नीट (NEET-UG) परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर या परीक्षेमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. तसेच नुकत्याच झालेल्या यूजीसी-नेट (UGC-NET) या परीक्षेमध्ये देखील मोठा गैरव्यवहार झाला आहे. या प्रकरणाचा भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ (DYFI)  च्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे.

सदर परीक्षा एनटीए या वादग्रस्त संस्थेद्वारे घेण्यात आली असून . सदर संस्था ही  नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असते. सदर  संस्थेला कायमचे बरखास्त करा अशी आमची मागणी आहे. तसेच झालेल्या सर्व प्रकरणाचा तीव्र निषेध असून सदर प्रकरणामुळे विद्यार्थ्यांना खाजगी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा लागत असून केंद्र सरकारचे वैद्यकीय शिक्षणाबद्दलचे खाजगीकरणाचे व व्यापारीकरणाच्या धोरणामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात चालले आहे. तर दुसरीकडे 18 जून रोजी युजीसी नेट ही परीक्षा पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लगेच रद्द करण्यात आली. त्यात सुद्धा गैरप्रकार घडल्याचे समोर आले आहे. तसेच CSIR-NET, NEET-PG या परीक्षेमध्ये देखील मोठा गोंधळ चालला आहे. त्यामुळे सदरील पूर्ण भ्रष्टाचाराचा निपक्ष:पाती व पारदर्शकपणे तपास करून एनटीए या संस्थेवर कायमस्वरूपी बंद घालावी, तसेच या सर्व प्रकरणाला पाठीशी घालणाऱ्या केंद्रीय शिक्षणमंत्र्यानी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी युवा महासंघ करत आहे तरच लाखो विद्यार्थ्यांना न्याय मिळेल.

प्रमुख मागण्या :

1) NEET परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली निष्पक्ष व पारदर्शकपणे चौकशी करण्यात यावी व दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी. 2) नीट सह युजीसी-नेट, सीएसआयआर- नेट, नीट-पीजी या परीक्षांमध्ये चालवलेल्या गोंधळाची वगैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी.

3) या सर्व परीक्षांमध्ये होत असलेल्या गैरप्रकाराला जबाबदार असलेली एनटीए ही संस्था तात्काळ बरखास्त करण्यात यावी.

4) या राष्ट्रीय परीक्षांमधील सातत्याने होत असलेल्या गैरव्यवहाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.

5) NET आणि NEET परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारने नुकसानभरपाई द्यावी.

6) पीएचडी प्रवेशासाठी अनिवार्य NET स्कोअरची अलीकडेच स्वीकारलेली प्रणाली तात्काळ मागे घ्या. त्यासाठी पूर्ववत पद्धती सुरू करा.

7) प्रवेशपूर्व परीक्षा केंद्रीकृत पद्धतीने घेणे थांबवा. त्यातून देशात माफियांचे पोषण होत आहे. राज्यांना याबाबतचे अधिकार पूर्ववत देण्यात यावे.

8) पेपरफुटीमधील प्रत्येक दोषींवर  कठोर कारवाई करा. सरकारने त्यांना पाठीशी घालू नये. 

9) या प्रकरणी एनटीएच्या सर्व जबाबदार व्यवस्थापकांवर कठोर कारवाई करा. 

सबब सदर प्रकरणी सरकार तात्काळ हस्तक्षेप करून संबधित दोषींवर कडक कारवाई करावी अन्यथा आंदोलनाचे स्वरूप व्यापक आणि उग्र होईल.जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास शासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी ही नम्र विनंती. 

आपले नम्र 

विक्रम कलबुर्गी 

जिल्हा अध्यक्ष 

ॲड.अनिल वासम 

जिल्हा सचिव  

भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ (DYFI) जिल्हा समिती, सोलापूर.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages