राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार
साहेबांची सोलापूर शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी घेतली भेट आणि
सोलापुरातील सत्कार समारंभासाठी दिले निमंत्रण...
बारामती(कटूसत्य वृत्त ):-नुकत्याच झालेल्या लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत पक्षाने घवघवीत यश संपादन केले, म्हणून सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या वतीने दिनांक ०८/०६/२०२४ रोजीच्या शहर कार्यकारणीच्या झालेल्या बैठकीमधील ठरवानुसार पक्षातील निवडून आलेले सर्व ८ खासदारांचा व २ उमेदवारांचा सत्कार राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार साहेबांच्या शुभहस्ते करण्याचे ठरले होते. सदर कार्यक्रम हा मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमास परवानगी व वेळ मिळावे म्हणून सोलापूर शहरातील पक्षाचे ज्येष्ठ नेते शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या नेतृत्वाखाली आज रोजी बारामती येथे शरदचंद्र पवार साहेबांची भेट घेऊन सदर कार्यक्रमासंदर्भात चर्चा करून परवानगी घेण्यात आली.
यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी महापौर महेश कोठे, प्रदेश उपाध्यक्ष माजी महापौर एडवोकेट बेरिया, माजी महापौर नलिनी ताई चंदेले उपस्थित होते.

No comments:
Post a Comment