कोण म्हणतंय सोलापूर स्मार्ट सिटी आहे म्हणून एकदा या आमच्या प्रभागात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 4, 2024

कोण म्हणतंय सोलापूर स्मार्ट सिटी आहे म्हणून एकदा या आमच्या प्रभागात

 कोण म्हणतंय सोलापूर स्मार्ट सिटी आहे 

म्हणून  एकदा या आमच्या प्रभागात

नीलम नगर नक्का वस्ती येथील रस्त्यांची दयनीय अवस्था

सोलापूर (कटूसत्य वृत्त ):-एमआयडीसी नीलम नगर भागातील नक्का वस्ती येथील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. सोलापुर शहरात मागील 10 ते 15 दिवसापासून जोरदार पावसाला सुरुवात झाल्यामुळे या संपूर्ण भागात चिखल व दलदल पसरला आहे.रस्ते दिसणे मुश्किल झाले आहे. या भागात पावसामुळे सखल भागात पाणी शिरत असल्याने येथील रहिवाशांना राञ  जागुन काढावी लागते याबाबत आमदार सुभाष देशमुख व। प्रभागातील माजी नगरसेविका व त्यांचे पती व्यंकटेश कोंडी यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीच दखल घेत नाही या भागातील नागरिक नारक याताना भोगत आहेत.  जिकडे तिकडे चिखल दलदल मुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. डेंगूसदृश्य आजाराने प्रभागातील नागरिक दवाखान्यात उपचार सुरू आहे. व बहुतांश महिला व लहान मुलांना सर्दी डोकेदुखी हिवतापाने आजारी पडले आहेत. येथील नागरिकांनी   जनदर्पण न्युजशी बोलताना सांगितले येथेच जवळ असलेल्या नक्क वस्ती येतील मूकबधिर शाळा असून तेथे शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना चिखलातून वाट काढत जावे लागते येथील विडी कामगार महिलांना  कारखान्यात माप देण्यासाठी या चिखलातून वाट काढत जावे लागते.

 कोण म्हणतंय सोलापूर स्मार्ट सिटी आहे म्हणून एकदा आमच्या गल्लीत या पहा मग कळेल सोलापूर स्मार्ट आहे. असे येथील  नागरिकांचेनागरिकांचे म्हणणे आहे. 

   आमदार साहेब आपण निवडुन येउन पाच वर्ष होत आहे आपल्या वचन नाम्यात रस्तेड्रेनेज लाईन मूलभूत सुविधा देण्याचे वचन दिल होता. आता परिस्थिती अशी आली आली आहे. कि आमदार साहेब रस्ते देता का रस्ते व मूलभूत सुविधा देता का अशी विचारण्याची वेळ आली आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages