उद्योजक राजू खरे यांचे वतीने विठ्ठल भाविक भक्तांनसाठी अन्नदान. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 19, 2024

उद्योजक राजू खरे यांचे वतीने विठ्ठल भाविक भक्तांनसाठी अन्नदान.

 उद्योजक राजू खरे यांचे वतीने विठ्ठल भाविक भक्तांनसाठी अन्नदान.

पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मातोश्री स्व.गंगुबाई संभाजी शिंदे यांचे स्मरणार्थ आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी भाविक भक्तांनसाठी  मोफत अन्नदान व फराळाचे वाटप गोपाळपूर येथे शिवसेनेचे पक्ष प्रतोद महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले.

आघाडी एकादशीनिमित्त दिवसभर मोफत फराळाचे वाटप करण्यात आले. याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला आहे.उद्योजक राजू खरे हे स्वखर्चातून हे अन्नदान व फराळाचे वाटप करण्यात आले. मोहोळ विधानसभा मतदार संघांचे उमेदवार उद्योजक राजू खरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मातोश्रीच्या स्मरणार्थ अन्नदान व फराळ वाटप करण्यात आले. खरे यांनी आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.तसेच अनेकांना आर्थिक, शैक्षणिक, वैद्यकीय मदत ते नेहमी करीत असतात.गोपाळपूर येथील जनाबाईंचे दर्शन घेऊन ये जा करणाऱ्या भाविकांना या लाभ घेता आला आहे. यासाठी मागील दोन दिवसापासून राजु खरे यांचे अनेक कार्यकर्ते परिश्रम घेत होते.

यावेळी राजू खरे, त्यांच्या पत्नी सौ तृप्तीताई खरे, बंधू विजय खरे, त्यांच्या दोन्ही मुलींसह खरे यांच्या परिवारातील सर्व सदस्य सदर कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते तसेच त्यांच्या हस्ते फराळ वाटप करण्यात आले. यावेळी राजु खरे मित्र परिवार, कार्यकर्ते, समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages