वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या निकालाच्या बाबतीत सकल मराठा समाजाने केला गंभीर आरोप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, June 8, 2024

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या निकालाच्या बाबतीत सकल मराठा समाजाने केला गंभीर आरोप

 वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या निकालाच्या बाबतीत 

सकल मराठा समाजाने केला गंभीर आरोप 

सोलापूर(कटूसत्यवृत्त):-वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या निकालाच्या बाबत पूर्ण देशभर वादंग माजलेला असताना नवनवीन गोष्टी नीट परीक्षेच्या बाबतीत समोर येत आहेत. 14 जून रोजी असणारा निकाल कोणतीही पूर्व सूचना न देता आणि आणि मागणी नसताना लोकसभेच्या निवडणुकीच्या निकाला दिवशी म्हणजे चार जून रोजी घेण्यात आला आणि त्यातून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला परंतु या वैद्यकीय प्रवेश परीक्षेत तथाकथित गुणवंत विद्यार्थ्यांची झालेली फुगीर वाढ ही संशयास्पद असल्याचा गंभीर आरोप सोलापूर सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी केलेला आहे. 

दरम्यान,ठराविक परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांनाच मोठ्या प्रमाणावर मार्क्स पडल्याचे दिसून आल्याने तसेच परीक्षेच्या गुणांच्या संख्येमध्येही आजपर्यंत न झालेली अफरातफर दिसून आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना भेटून याबाबतच्या गंभीर परिस्थितीची माहिती  आज शुक्रवारी सायंकाळी माऊली पवार, संबंधित पाल्य, त्यांचे पालक यांच्या शिष्टमंडळांनी दिलेली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages