जिल्हा परिषद कृषी विभागाचे नूतन कार्यालय स्थलांतरित
सोलापूर(कटूसत्य वृत्त):-जिल्हा परिषद कृषी विभागाचे नूतन कार्यालय स्थलांतरित झाले .त्याच्या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, मुख्य लेखा वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते .कार्यक्रमाचे प्रस्ताविक कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे यांनी केले .याप्रसंगी मान्यवरांचे रोप देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नवीन कार्यालयात आपण जसे समाधानी आहात त्याप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक शेतकरी समाधानी होईल अशा पद्धतीचे कामकाज करावे असे कृषी विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन करण्यात आले .याप्रसंगी जिल्ह्यातील सर्व कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्रशासन अधिकारी विवेक लिंगराज, स्वागत सागर बारावकर तर आभार प्रदर्शन नंदकुमार पाचकुडवे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उमाकांत कोळी, लक्ष्मण वंजारी, राजेश्री कांग्रे, मल्लिकार्जुन स्वामी, ओम कोकणे , हारूनपशा नदाफ ,अंबिका वाघमोडे,महानंदा कुंभार, रोहित शिंदे आदींनी परिश्रम घेतले
0 Comments