Hot Posts

6/recent/ticker-posts

तिघे जण पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले

 तिघे जण पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले


सोलापूर(कटूसत्य वृत्त):-दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव परिसरात झालेल्या पावसामुळे ओढ्याच्या पूलावर आलेल्या पाण्यात मंगळवारी मध्यरात्रीनंतर एका दुचाकीवर पूल ओलांडत असलेले तिघे जण पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले असल्याचे माहिती मिळतेय.

ज्ञानेश्वर संभाजी कदम, बबन संदीपान जाधव आणि महादेव रेड्डी अशी त्यांची नावे असून त्यापैकी बबन जाधव आणि महादेव रेड्डी यांना पुराच्या पाण्याबरोबर वाहून जात असताना ओढा प्रवाहातील झाडांना पकडून स्वतःला वाचविण्यात यश आले तर ज्ञानेश्वर कदम सकाळपर्यंत मिळून आला नसल्याचा ग्रामस्थांमध्ये बोललं जातंय.

Reactions

Post a Comment

0 Comments