आम्हा शूद्रांना अच्छे दिन येणार!
खरे तर हा आमच्या हिंदू धर्मातील क्रांतिकारक क्षण की नरेंद्र जी मोदी नावाचा, घासी तेली जातीचा माझ्या वर्णातील एक शूद्र ध्यानधारणा करतोय. विश्वाच्या निर्मितीपासून त्याच्यात व आमच्यात तमो गुण आहेत, पिशाच्च ही योनी/ गण आहे. मृत्यूनंतर आमचे स्थान नरकात असते.शूद्राने असे कृत्य करणे हे माझ्या हिंदू धर्मात (संदर्भ भगवद्गीता) असुरी कृत्य मानले जाते. त्याला प्रचंड मोठी शिक्षा सांगितलेली आहे
रामाच्या राज्यात शूद्र वर्णाच्या शंबुकाने त्याला वर्ज्य असलेले तप ,यज्ञ, ध्यान धारणा यासारखे कृत्य केले होते. त्या वेळच्या सत्वगुणी ब्राह्मण वर्णाच्या ऋषीमुनींच्या सांगण्यावरून प्रभू रामचंद्राने शंबुकाचा वध केला होता. आता आम्हा शूद्र जनतेने समता देणारी लोकशाही आणली. शंबुकाला आता शिक्षा करता येणार नाही. आपले श्रेष्ठत्व व शोषणाचा अधिकार गमावतील ते ऋषीमुनींचे वंशज कसले?
ऋषीमुनींच्या वंशज्यांनी आधुनिक धूर्त शंबुकाला हाताशी धरले.आणि आमची लोकशाही व राज्यघटनाच गुंडाळून टाकली. धुर्त शंबुकाच्या रक्षणासाठी अर्धी चड्डी घालून हातात लाठी घेऊन आधुनिक ऋषीमुनी आज बाहेर पडलेत. याही शंबुकाचा वापर करतील. गरज संपली की बाहेर फेकतील.आणि दुसऱ्या शंबुकाच्या शोधासाठी बाहेर पडतील. धन्य तो आधुनिक शंबुक व धन्य त्याचे समर्थक!
सुरेश खोपडे
0 Comments