कंगनासोबत झालेल्या घटनेवर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया, म्हणाले, "ती फक्त खासदार नाही..."
मुंबई (कटूसत्य वृत्त);-नवनिर्वाचित खासदारकंगना राणौतसोबत चंदीगढ विमानतळावर धक्कादायक घटना घडली. CISF महिला सुरक्षाकर्मीने तिच्या कानशिलात मारली. शेतकरी आंदोलनाविरोधात कंगनाच्या वक्तव्याचा त्या महिलेच्या मनात राग होता.
इन्स्टंट बॉलिवूडला दिलेल्या मुलाखतीत अनुपम खेर म्हणाले, "ये फारच दुर्दैवी आहे. असं व्हायला नको होतं. विशेषत: अशा व्यक्तीकडून जी स्वत: एक सुरक्षारक्षक आहे. ज्या तक्रारी आहेत, त्या वेगळ्या पद्धतीनेही हँडल केल्या जाऊ शकतात. मला वाटतं भारतातील महिलांनी यावर प्रतिक्रिया दिली पाहिजे. केवळ यासाठी नाही कारण कंगना एक खासदार पण यासाठी कारण ती एक महिलाही आहे."
कंगनासोबत झालेल्या घटनेनंतर सुरक्षारक्षक महिला कुलविंदर कौरला निलंबित करण्यात आले. कंगनाने यावर प्रतिक्रिया देत पंजाबमधील वाढत्या दहशतवाद, उग्रवादावर चिंता व्यक्त केली. एकीकडे मनोरंजनसृष्टीतून अनेक जण कंगनाच्या बाजूने उभे राहिले. रवीना टंडन, उर्फी जावेद,अनुपम खेर, अध्ययन सुमन, शेखर सुमन, अशोक पंडित यांनी या घटनेची निंदा केली. तर दुसरीकडे कुस्तीपटू बजरंग पुनिया, इतर काही खेळाडू, संगीतकार विशाल ददलानीने महिलेची बाजू घेतली आहे.
कंगना राणौतने नुकतंच लोकसभा निवडणूकीत दणदणीत विजय मिळवला. सध्या कंगना दिल्लीत असून खासदारकीची शपथ घेणार आहे. तसंच मंडीतील जनतेची सेवा करण्यासाठी आता ती बॉलिवूड कायमचं सोडणार असल्याचीही चर्चा आहे.
0 Comments