Hot Posts

6/recent/ticker-posts

सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी मोठी अपडेट! बेसिक पगार ते DA-DR वर थेट परिणाम होणार

 

सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी मोठी अपडेट! बेसिक पगार ते DA-DR वर थेट परिणाम होणार


 सोलापूर (कटूसत्य वृत्त);-2024 च्या सुरुवातीला महागाई भत्ता 50% पर्यंत पोहोचला. गेल्या काही महिन्यांत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या इतर अनेक भत्त्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. आता महागाई भत्ता किंवा महागाई सवलतीच्या पुढील वाढीदरम्यान केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मूळ वेतनात वाढ झाल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये आल्या आहेत.

साधारणत: जुलैपासून केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा डीए आणि डीआर वाढतो. डीए आणि डीआरने 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडल्याने मूळ वेतनात डीए आणि डीआर आपोआप जोडले जातील, अशी अटकळ बांधली जात आहे.

यामुळे देशातील कोट्यवधी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या मूळ वेतनात वाढ होणार आहे. केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना जुलै 2024 पासून मूळ वेतनात वाढ अपेक्षित आहे का? पुढे हा बदल होईल का? असा सवाल केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी विचारत आहेत.

मूळ वेतनात DA आणि DR जोडले जातील का?
50 टक्क्यांची मर्यादा ओलांडल्यानंतर मूळ वेतन डीएशी जोडण्याचा मुद्दा समोर आल्यानंतर कयास सुरू झाले. पाचव्या वेतन आयोगाच्या अहवालात (पॅरा 105.11) महागाई भत्त्याचे मूळ वेतनात विलीनीकरण करण्याची शिफारस करण्यात आली होती आणि अशा विलीनीकरणाला महागाई वेतन म्हटले होते.या शिफारशीनंतर 2004 मध्ये मूळ वेतनाच्या 50 टक्के महागाई भत्त्याचे विलीनीकरण करून भत्ते व सेवानिवृत्ती लाभांची गणना करण्याच्या उद्देशाने महागाई वेतन निर्माण करण्यात आले. पण नंतर त्यात बदल करण्यात आला. मात्र, हे बदल आपोआप होणार नाहीत. त्यावर सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे.

महागाई भत्ता आता 50 टक्के केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. सरकारने मार्चमध्ये महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्क्यांवर नेला होता. याची अंमलबजावणी 1 जानेवारी 2024 पासून करण्यात आली. मात्र, महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत वाढल्याने तो आता मूळ वेतनात जोडला जाईल आणि महागाई भत्त्याची गणना स्वतंत्रपणे केली जाईल, असे मानले जात होते.मात्र, तसे होणार नाही. महागाई भत्ता 50 टक्के असला तरी तो मूळ वेतनात जोडला जाणार नाही. पुढच्या वेळी महागाई भत्ता वाढल्यानंतरही त्याची मोजणी बेसिक सॅलरीच्या आधारे केली जाणार आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Reactions

Post a Comment

0 Comments