जरांगे पाटलांनी उपोषणाबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय, अंतरवालीमधून मोठी बातमी
जालना (कटूसत्य वृत्त);- मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला. त्यांच्या आंदोलनानंतर सरकारकडून मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी देण्यात आली.
मनोज जरांगे पाटील हे आजपासून पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसणार आहेत. आपण आंदोलनावर ठाम असून, परवानगीची गरज नसल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे पाटील आज दहा वाजेपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आता सर्वांचं लक्ष अंतरवाली सराटीकडे लागलं आहे.
ग्रामस्थांचा विरोध
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला अंतरवाली सराटीममधील काही ग्रामस्थांसह इतर दोन गावातील ग्रामस्थांनी देखील विरोध केला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी या ग्रामस्थांनी केली आहे. अद्यापही मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला परवानगी देण्यात आलेली नाही, मात्र तरी देखील मनोज जरांगे पाटील हे उपोषणावर ठाम आहेत.
0 Comments