एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का! शिंदे गटातील 5-6 आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात
मुंबई (कटूसत्य वृत्त);-एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का! शिंदे गटातील 5-6 आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात
महाराष्ट्राचं सत्ता समीकरण आता पुन्हा एकदा नवं वळण घेण्याची शक्यता आहे. कारण, आता शिंदे गटातील 5-6 आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रात लोकसभेची केवळ एक जागा जिंकण्यात यश मिळाल्यानंतर हा दावा करण्यात आला. राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोणत्याही पक्षाचे नाव न घेता अनेक नेते त्यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले. आम्ही 9 जून रोजी आमच्या बैठकीत या प्रस्तावांवर विचार करू. 10 जून रोजी आमचा स्थापना दिवस आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा -
0 Comments