शासकीय वसतिगृहात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवाहन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, June 8, 2024

शासकीय वसतिगृहात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवाहन

                शासकीय वसतिगृहात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवाहन



सोलापूर(कटूसत्य वृत्त);- दि. 07 (जिमाका) :-  बार्शी येथील मागासवर्गीय  मुलांच्या वसतीगृहांमध्ये सन 2024-25 या  शैक्षणिक वर्षात प्रवेश प्रक्रीया सुरु झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज सादर करावेत असे आवाहन वसतिगृहाचे गृहपाल के.ए. सारंगकर यांनी केले आहे.

          डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुणवंत  मुलांचे शासकिय वसतिगृह नवीन, गाडेगांव रोड, आयटीआय कॉलेज समोर म्हाडा कॉलनी , बार्शी, ता. बार्शी तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह जुने,गाडेगाव  रोड, आयटीआय कॉलेजवळ,बार्शी या  वसतिगृहाची सन. 2024-25 या शैक्षणिक वर्षाची वसतिगृह प्रवेश प्रकिया सुरु करण्यात आलेली आहे. प्रवेशासाठी विनामुल्य् अर्ज वाटप वसतिगृहावर दि. 05जून 2024 पासुन सुरु झालेले आहेत.

        वसतिगृहात प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना  शैक्षणिक साहित्य, गणवेष, निर्वाह भत्ता, वसतिगृहामध्ये राहण्याची, नाष्टा व दोन वेळेच्या जेवणाची सोय मोफत करण्यात येते. तरी इच्छुक गरजु व पात्र विदयार्थ्यानी याचा लाभ घ्यावा. असे आवाहनही वसतिगृहाचे गृहपाल के.ए. सारंगकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages