सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार कडून सोलापूरांच्या अपेक्षा
सोलापूर(कटूसत्य वृत्त):-केंद्रातुन सोलापूरकरांच्या ह्या समस्या सोडविण्यासाठी सातत्यपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि इमानदारीने करावे प्रयत्न
०१) केंद्रिय पेयजल मंत्रालय तथा सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकार्यांची सांगड घालून सोलापूर शहरात नियमित पाणी पुरवठा आणि त्याचे सुयोग्य नियोजन करुन घेणे.
०२) केंद्राच्या पेयजल मंत्रालयाकडुन निधी मंजूर करुन हिप्परगा तळ्यातील गाळ काढुन त्या पाण्याचा वापर शहराच्या पाणीपुरवठा साठी करणे.
०३) सोलापूरच्या युवकांचे स्थलांतर थांबवण्यासाठी केंद्र सरकार कडुन केंद्रीय वाणिज्य मंत्रालया कडुन एस.ई.झेड.अंतर्गत कुंभारी, मंगळवेढा, दक्षिण सोलापूरात ५०० एकराच्या वरील एम.आय.डि.सी. मंजुर करुन घेणे.
०४) सोलापूरात गुंतवणूक करणार्या कंपन्या आणि उद्योगजकांना स्थानिक खंडणीखोर गुंडाचा त्रास होऊ न देता त्यांना रेड कार्पेट व्हि.व्हि.आय.पी. ट्रिटमेंट देऊन सिंगल व्हिंडो सोयी सुविधा उपलब्ध करुन ०७ दिवसात त्यांचा प्रकल्प मंजूर करुन आमलात आणणे.
०५) मिनिस्ट्री अॉफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी यांच्या कडुन आय.टी. पार्क आणि सेमी कंडक्टर पार्क निर्मितीसाठी १००० एकरात नवीन एस.ई.झेड तथा स्पेशल हायटेक सिटी नगर कींवा वसाहत निर्माण करुन राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय आय.टी. कंपन्यां आवश्यक सोयी जसे २४x७ हाय व्होल्टेज अखंडित वीज पुरवठा, इंडस्ट्री लेव्हल हाय स्पीड इंटरनेट कनेक्शन, जी.एस.टि. आणि इतर टॅक्स मध्ये सुट अश्या सुविधा उपलब्ध करुन सोलापूरसहित धाराशिव आणि लातुर जिल्हातील किमान ०५ लाख आय.टी. इंजिनिअर्सं यांना रोजगार सहज शक्य.
०६) सोलापूरच्या हक्काचे मिलेट सेंटरच्या उभारणीसाठी केंद्रीय कृषी मंत्रालया कडुन भरगोस निधी खेचून आणणे.
०७) स्मार्ट सिटीच्या कामाचे फॉरेन्सिक ऑडिट करणे.
०८) जुळे सोलापूर तथा हद्दवाड भागासाठी स्वतंत्र महानगरपालिका कींवा प्राधिकरण निर्माण करुन प्रशासकीय इमारत स्थापन करणे.
०९) सोलापूरच्या युवकांना मावा, मटका, गांजा, व्याजबट्टा, हातभट्टी तथा इतर आमली पदार्थांच्या नशेतुन पूर्णपणे सुटका करणे.
१०) सोलापूरची शेंगा चटणी, शिक कडाई इत्यादी पदार्थ आणि वस्तुंना आंतरराष्ट्रीय मानांकन जी.आय. टॅग मिळण्यासाठी प्रयत्न करणे.
११) केंद्रीय सांस्कृतिक मंत्राल्याकडुन सोलापूरात जास्तीत जास्त नाटय़गृहाच्या निर्मितीसाठी निधी मंजूर करुन त्याची आमल बजावणी करणे.
१२) सोलापूरातुन निघणार्या सर्व जातींच्या महा पुरुष आणि स्त्रीयांच्या मिरवणुकांत डॉल्बी वर नियंत्रण आणणे तथा मिरवणूकीच्या दिवशी नागरिकांना वाहतूकसहित इतर गोष्टींचा त्रास न होण्यासाठी सकारात्मकतेने प्रयत्न करणे.
१३) केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाकडुन मंजूर शहरांतर्गत गेल्या कैक वर्षांपासून प्रलंबित उड्डाण पुलांचे कार्यारंभ तात्काळ करणे.
१४) ५४ मीटर रस्ता व बाह्य वळण रस्ता यासाठी केंद्रातुन निधी महानगरपालिकेस सुपूर्द करुन सदर प्रश्न मार्गी लावणे.
१५) सोलापूर महानगरपालिकेची डबघाईला आलेली एस.एम.टी. परिवहन सेवेत सी.एन.जी. आधारित २५ सिटर बससे केंद्राच्या विविध योजनेतून उपलब्ध करून परिवहन सेवेस उर्जितावस्था आणणे.
१६) केंद्रीय शहरि विकास मंत्रालय तथा नगर विकास विभागाकडून सोलापूर शहरातील बी वन बी टू हदवाड शहरातील बी एम बी टू चा प्रश्न केंद्र तथा राज्य सरकारकडून तातडीने निकाली काढणे.
१७) सोलापूर शहराच्या मोठ्या मोक्याच्या ठिकाणी ऑलिंपिक स्पर्धेत सोलापूरच्या खेळाडुंचा टक्का वाढण्यासाठी जलतरण तलाव, विविध क्रिडा प्रकारचे सर्व सोयीसुविधांनी अद्यावत आधुनिक वेल मेंटेन ग्राऊंडची निर्मिती तथा निधी केंद्रीय क्रीडा मंत्रालया कडुन खेचून आणणे.
१८) होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा तातडीने सुरू करुन सोलापूर - मुंबई, सोलापूर - दिल्ली, सोलापूर - हैदराबाद, सोलापूर - बंगलोर, सोलापूर - चेन्नई, तिरुपती ह्या मार्गांच्या विमानसेवेसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करुन ते सुरु करणे.
१९) सोलापूर महानगरपालिकेचा इतर मोठ्या शहरांच्या तुलनेत टॅक्स प्रचंड असुन त्यास केंद्रीय नगरविकास मंत्रालया कडुन सुधारणा करुन घेत सोलापूरकरांना परवडेल अश्या वाजवी आकरणीसाठी गांभीर्याने विचार करणे.
२०) सोलापूर शहर आणि जिल्हाच्या पर्यटण वाढीसाठी विविध कार्यक्रम आणि योजना केंद्रातुन कार्यान्वित करणे.
२१) केंद्रच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहरात प्रत्येक ५०० मिटर वर महिला आणि पुरुष अद्यावत आणि स्वच्छ प्रसाधनगृहांची निर्मिती युध्द पाटळीवर करणे.
२२) मध्य रेल्वेचे सोलापूर विभागाचे मंडल वाणिज्य प्रबंधक म्हणजेच डि.आर.एम यांचा क्षेत्रफळ अनेक वर्षांपासून कमी होत चालला असुन ज्याचा परिणाम सोलापूरच्या उत्पन्नावर होतोय, ह्यावर विषेश लक्ष केंद्रित रेल्वे मंत्र्यांचे वेधणे.
२३) सोलापूर - पणजी, सोलापूर - नागपूर, सोलापूर - हैदराबाद, सोलापूर - बंगलोर, सोलापूर - पुणे, सोलापूर - मुंबई, सोलापूर - नवी दिल्ली साठी नव्या वंदे भारत, इंटरसिटी तथा विषेश गाड्या तातडीने मंजूर करुन घेणे.
२४) आय.टी. पार्कच्या धर्तीवर टेक्स्टाईल आणि गारमेंट पार्क जीथे ०% ते कमीत कमी जी.एस.टि.चे जागेसहित तरतूद करणे.
२५) आय.टी. व्यतिरिक्त इतर उद्योगांच्या वाढीसाठी केंद्रातील विविध मंत्रालयाच्या विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय राखणे.
२६) पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठास आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी प्रचंड मेहनत घेणे.
२७) सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर आणि मंगलवेढा ह्या शहरातील विविध जाती धर्मांच्या प्रार्थनास्थळांच्या विकासासाठी निधी आणि योजना मंजूर करून आणणे.
वर नमूद केलेल्या सर्व गोष्टी ह्या आम्ही निवडून दिलेल्या खासदारांनी सोलापूरसाठी करणे आवश्यक आहे. केंद्र सरकारात ४८ मंत्रालय, २५६ विभाग आणि १२४८ विविध योजना आणि कार्यक्रम राबविले जातात ज्यास केंद्र सरकार म्हणेल तेवढा पैसा मंजूर करण्यासाठी सदैव तयार असतो. गरज असते केवळ अभ्यासपूर्णपणे मागणी करण्याची आणि सोलापूरच्या विकासासाठी तळमळ असण्याची. आम्ही सोलापूरकर ह्यावेळी फक्त आणि फक्त विकास पाहुनच मतदान केले आहे.
.jpg)
0 Comments