काशिनाथ बिराजदार यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार
सोलापुर(कटूसत्य वृत्त):-महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे माजी प्रशासनाधिकारी काशिनाथ बिराजदार यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार समारंभ आयोजित केल्याची माहिती ..डाॅ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रदेश महासचिव सुनिल चव्हाण.यांनी दिली.
हा कार्यक्रम सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या शुभहस्ते तर पालिका उपायुक्त तैमुर मुलाणी यांच्या अध्यक्षतेखाली निर्मलकुमार फडकुले सभागृहात शुक्रवार दिनांक ३१मे रोजी सकाळी ११ वाजता पार पडणार आहे.शिक्षण मंडळात लिपीक पदापासुन ते प्रशासनाधिकारी पदापर्यंत त्यांनी ३४ वर्षे सेवा बजावली आहे.या कार्यक्रमास माजी शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवणे, प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख,प्रशासनाधिकारी संजय जावीर हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन काशिनाथ बिराजदार गौरवव सोहळा समितीच्यावतीने करण्यात आहे आहे.

0 Comments