Hot Posts

6/recent/ticker-posts

पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 299 व्या जयंतीनिमित्त

 पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 299 व्या जयंतीनिमित्त

 वधु-वर पालक परिचय मेळावा संपन्न

   मेळाव्यास महाराष्ट्र व कर्नाटक येथील १ हजार ७००  धनगर समाज बांधवाचा सहभाग


      सोलापूर(कटूसत्य वृत्त):-पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 299 व्या जयंती निमित्त 8 वा धनगर समाज वधु-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक २६ मे २०२४ रोजी ड्रिम पॅलेस - कुश सभागृह येथे करण्यात आले होते. या मेळाव्यास महाराष्ट्र व कर्नाटक येथील इच्छुक वधु-वर व पालक असे सुमारे १ हजार ७००  समाज बांधव सहभागी झाले असल्याची माहिती  संस्थापक अध्यक्ष रविंद्र नागणकेरी  यांनी दिली.

         मेळाव्यास प्रमुख पाहुणे विजयपुर येथील धर्मशास्त्राचे अभ्यासक  पंडित चंद्रकांत बिज्जरगी व राष्ट्रवादी काँग्रेस [ शरद पवार गट ] युवती प्रदेशाध्यक्ष मा.सक्षणा सलगर यांच्या उपस्थितीत होते. प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलित करून कार्यक्रम सुरवात झाली.  

           चंद्रकांत बिज्जरगी हे विजयपुर -कर्नाटक मधील  प्रसिद्ध साहित्यिक असून, त्यांनी’ हालुमत ‘हा धनगर समाजावर  धर्मग्रंथ लिहिला आहे.या धर्मग्रंथात त्यांनी धनगर समाजाचा  उगम,चालीरीती, देशातील धनगर समाजाची जाती व उपजाती , त्यांची परंपरा तसेच समाजात जन्माला आलेले राष्ट्रपुरुष व राजा महाराजांची माहिती देण्यात आली आहे.हा ग्रंथ सध्या अतिशय प्रसिद्ध असून, ह्या धर्मग्रंथाविषयी बिज्जरगी  मार्गदर्शन केले.

        यावेळी मेळाव्यात  राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारक व महाराष्ट्र युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी  सांगितले की, नविन पिढीतील उच्चशिक्षित  मुला व मुली मधील   विचार विनिमय मिळते जुळते होत नसल्याने घटस्फोटाचे प्रमाणात वाढ झाली आहे. कौटुंबिक व आर्थिक अडचणींवर सक्षम निर्णय,  एकत्रित कुटूंब व कुटूंबातील प्रमुखांचे नियोजन नसल्याकारणाने अनेक कुटुंब अडचणीत येत आहेत .कुटुंबातील  जेष्ठ व वृध्दांना आपुलकी व  सन्मानाचे वागणुक मिळत नसल्याने वृध्दाश्रमाकडे ओढा वाढला आहे . उच्चशिक्षणाचा वापर कुटूंबात कार्पोरेट कंपनीप्रमाणे चालु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

       मेळावा यशस्वी होण्यासाठी संस्थेतील पदाधिकारी सदाशिव व्हनमाने , सौ.ललिता लवटे , सुहास गडदे , सौ.वासंती पांढरे,भाऊसाहेब चोरमले ,अशोक नरुटे ,संजय केरुरकर,  मनोज बनसोडे , रामचंद्र धर्मशाळे , व संचालक, सन्माननीय सदस्य यांनी परिश्रम घेतले

Reactions

Post a Comment

0 Comments