बाळराजे पाटील यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त
युवा प्रबोधनकार वसंत हंकारे यांचे प्रबोधन
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- वृद्धाश्रमामध्ये गेलो. पंच्चाहत्तरीची आजी डोळ्यांमध्ये आसवं आणून बसली होती. बघवलं नाही म्हणून खिशामध्ये हात घातला. पाचशे रुपयांची नोट हाताला लागली. आजीच्या हातात ठेवली. आजीला म्हटलं, 'आजी काही पाहिजे असेल ते घे. हे संपल्यानंतर तुझा मुलगा तुला अजून पाचशे रुपये देण्यासाठी येईल'. 'नको पाचशे रुपये मला, माझं एक काम करशील का? मला माझा मुलगा येतो म्हणून गेला आहे तो अजून आला नाही. त्याची आणि माझी भेट घालून दे कितीही चुकला तर आईबापासमोर नतमस्तक होऊन बघ नक्की माफ करतील.' 'आईबाप समजून घेताना' या विषयावर युवा प्रबोधनकार वसंत हंकारे प्रबोधनप्रसंगी बोलताना सांगितले. लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त युवा प्रबोधनकार वसंत हंकारे प्रबोधन प्रसंगी बोलत होते. व्याख्यानाचा विषय आईबाप समजून घेताना. कार्यक्रमप्रसंगी प्रियंका पाटील, प्राजक्ता पाटील, डॉ. विनिता गोरे , डॉ. विशाखा फाळके-पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. हंकारे पुढे म्हणाले, रक्ताचे पाणी करून ज्या आईबापाने संभाळलं, शिकवलं त्यांचा जिवंत असेपर्यंतच संभाळ करा. मेल्यानंतर त्याच्यापर्यंत काहीच पोहोचत नाही.
0 Comments