Ads

Ads Area

जिल्हा ग्रंथालय संघास विजय कोलते यांची भेट

 जिल्हा ग्रंथालय संघास विजय कोलते यांची भेट


सोलापूर(कटूसत्यवृत्त):-सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्यावतीने चालवण्यात येणाऱ्या "यशदा अभ्यासिका" या स्पर्धा परीक्षा केंद्राप्रमाणे राज्यातील सर्व ग्रंथालय संघांनी अभ्यासिका सुरू कराव्यात, वाचणारी माणसे यशस्वी होतात, ज्ञान ग्रंथातून मिळते, या अभ्यासिकेतून मुलं अधिकारी म्हणून बाहेर पडतील, अधिकाऱ्याने माणूस म्हणून नागरिकांना वागवावे, अधिकारी हे प्रशासनाचा केंद्रबिंदू असतात, छोटी माणसं मोठी कामे करू शकतात, इतरांना मदत करा, अभ्यासिकेस पहिला पगार द्या, संपर्कात रहा असे असे

आवाहन पुणे विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजय कोलते यांनी केले. सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ संचलित यशदा अभ्यासिकेस त्यांनी भेट दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथमित्र कुंडलिक मोरे यांनी करून संस्थेने केलेल्या तीस वर्षातील प्रगतीचा आढावा सांगितला.यावेळी सहायक ग्रंथालय संचालिका शालिनी इंगोले, सोलापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे आणि त्यांचे सहकारी अनिल बाविस्कर, ग्रंथालय निरीक्षक प्रमोद पाटील, माजी महापौर मनोहर सपाटे, सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ग्रंथमित्र विजयकुमार पवार, ग्रंथमित्र कुंडलिक मोरे, ग्रंथमित्र जयंत आराध्ये, संचालक धोंडीबा बंडगर, संचालिका सारिका मोरे, लिपिक दिपाली नरखेडकर, ग्रंथपाल वृषाली हजारे यांच्यासह विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. आभार ग्रंथमित्र जयंत आराध्ये यांनी मानलेPost a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close