माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळ निधीचे फॉर्म 24 मे पर्यंत भरावेत : गणेश इंगळे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, May 20, 2024

माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळ निधीचे फॉर्म 24 मे पर्यंत भरावेत : गणेश इंगळे

 माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळ निधीचे फॉर्म

 24 मे पर्यंत भरावेत : गणेश इंगळे 


 माळशिरस (कटूसत्य वृत्त):-  माळशिरस तालुक्यातील तलाठी हे शेतकऱ्यांना दुष्काळ निधीचे फॉर्म भरण्याची मुदत संपली आहे अस सांगत असल्यामुळे जगाचा पोशिंदा शेतकरी राजा दुष्काळ निधी पासून वंचित राहू लागला .ही बाब युवा सेनेचे जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी माळशिरस चे तहसीलदार सुरेश शेजूल  यांना भेटून निवेदन देऊन लक्षात आणून दिले असता शेजूल साहेबांनी 25 मे 2024 रोजी दुष्काळ निधीचे पोर्टल बंद होणार आहे त्यामुळे 24 मे 2024 पर्यंत मुदत वाढवून दिली आहे त्यामुळे  शेतकऱ्यांनी दुष्काळ निधीचे फॉर्म तात्काळ भरून घ्यावेत असे आव्हान युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी केल आहे यावेळी युवा सेना उपतालुका प्रमुख दुर्वा आडके संभाजी ब्रिगेड उपतालुका अध्यक्ष सचिन पराडे पाटील विक्रम गाडगे दादासाहेब आवारे सागर तांबडे इ उपस्थित होते .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages