महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संजय मंडलिकांवर
शरद पवारांची टीका
पुणे (कटूसत्य वृत्त):-कोल्हापूरचे शिंदे गटाचे खासदार आणि लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी छत्रपती शाहू महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. 'आत्ताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत. ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत. त्यामुळे कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे.', असे वक्तव्य संजय मंडलिक यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी टीका केली आहे. 'या प्रकारची टीका करतायेत याचा अर्थ विरोधकांची मानसिकता काय आहे हे दिसतेय.', अशा शब्दात शरद पवार यांनी संजय मंडलिकांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
0 Comments