Hot Posts

6/recent/ticker-posts

शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का

 शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का 


पुणे(कटूसत्य वृत्त):- भाजप नेते अतुल देशमुख यांनी दोन दिवसांपूर्वी पक्षाचा राजीनामा दिला होता. अतुल देशमुख यांच्याकडे भाजपच्या शिरूर लोकसभेच्या खेड-आळंदी विधानसभा मतदार संघाचे समन्वयक पदाची जबाबदारी होती.

आता त्यांनी राजीनामा दिल्यानंतर मोठा निर्णय घेतला आहे. अतुल देशमुख आज सायंकाळी 5 वाजता मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. अतुल देशमुख यांच्यासह भाजपाचे नगरसेवक, पदाधिकारी, बाजारसमिती संचालक, सरपंच, सदस्य अशा अनेकांचा आज पक्ष प्रवेश होणार आहे. शिरूर लोकसभा निवडणुकीत खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या नेतृत्वाखाली काम करणं म्हणजे यश मिळाले तर माझे आणि अपयश आलं की अतुल देशमुख यांचं अशी परिस्थिती आहे. त्यातच दिलीप मोहिते पाटील यांच्याशी असलेल्या संघर्षामध्ये काम करणं शक्य नाही, म्हणून आज राजीनामा दिला आहे. पुढच्या काळात आम्हाला न्यायिक मार्ग मिळेल त्यानंतर पक्षांतर करू अशी प्रतिक्रिया राजीनामा देताना अतुल देशमुख यांनी दिली होती. त्यानंतर त्यांनी आज सकाळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतला आहे.


दरम्यान अतुल देशमुख यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर त्याचा फायदा हा अमोल कोल्हे यांना होऊ शकतो. मात्र दुसरीकडे या मतदारसंघात महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. अतुल देशमुख यांच्या या निर्णयाचा त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments