Ads

Ads Area

मा केंद्रिय कृषी मंत्री शरदचंद्र पवार उद्या शेवगाव दौऱ्यावर आ निलेश लंके साठी जाहीर सभेचे आयोजन

 मा केंद्रिय कृषी मंत्री शरदचंद्र पवार उद्या शेवगाव दौऱ्यावर 

आ निलेश लंके साठी जाहीर सभेचे आयोजन

बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती



शेवगाव (कटूसत्य वृत्त):-  नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ आठ दिवसात तिसऱ्यांना या मतदारसंघात हजेरी लावणार आहेत. शेवगाव शहरातील खंडोबानगर येथे रविवारी दुपारी ३ वाजता प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते,माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार असल्याची माहिती राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सचिव अॅड. प्रतापकाका ढाकणे यांनी दिली.

        महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी गेल्या दोन अडीच वर्षांपासून दक्षिण लोकसभा मतदारसंघात संपर्क सुरू केला होता. दिवाळी दरम्यान हंगा येथे झालेल्या दिवाळी फराळाच्या कार्यक्रमासाठी त्यांनी नगर दक्षिण मतदार संघातील कार्यकर्त्यांना आमंत्रित केले होते.यावेळीच आ.लंके हे लोकसभेचे उमेदवार असणार असे अडाखे बांधण्यात येत होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या पत्नी जि.प. सदस्या राणीताई लंके यांनी शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून दक्षिण मतदार संघातील गावांना भेटी देत कार्यकर्त्यांची संवाद साधला.या शिवसंवाद यात्रेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर हा लंके यांनी नगर शहरात शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे आयोजन केले होते. या महानाट्याला नगरकरांसह नगर दक्षिण मतदार संघातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

       लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलत्या राजकीय घडामोडी सुरू असतानाच अजित पवार गटात असलेले आमदार लंके यांनी पुण्यात शरद पवार यांच्या हस्ते 'मी अनुभवलेला कोव्हिड' या पुस्तकाचे प्रकाशन केले. त्याचवेळी ते शरद पवार गटात प्रवेश करणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती परंतु त्यावेळी प्रवेश न करता लंके यांनी राजकीय संभ्रमावस्था कायम ठेवली.यानंतर झालेल्या राजकीय घडामोडीत शरद पवारांसह बाळासाहेब थोरात, उद्धव ठाकरे या आघाडीच्या नेत्यांकडून लंके यांना राजकीय पाठबळ मिळाल्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला. यानंतर पहिल्याच उमेदवारीच्या यादीत त्यांची नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाची उमेदवारी घोषित करण्यात आली.

        आमदार लंके यांच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेच्या समारोपाला नगरच्या गांधी मैदानात शरद पवार, आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात यांनी हजेरी लावली या सभेलाही नगरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.यानंतर राहुरी येथे झालेल्या प्रचारसभेला मतदारांनी भर उन्हात मोठा प्रतिसाद दिला त्या पाठोपाठ रविवारी शरद पवार यांची सभा शेवगाव येथे होत आहे या सभेलाही मतदार मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असल्याचा विश्वास अॅड. प्रतापकाका ढाकणे यांनी व्यक्त केला.या सभेसाठी मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close