मोडनिंब येथे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ
मोडनिंब (कटूसत्य वृत्त):- येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधून टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन माजी सभापती शिवाजी कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. श्री उमा विद्यालयच्या प्रागणात वैभवअण्णा मोरे मित्र परिवाराच्या वतीने या टेनिस क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले.सामन्यांचे समालोचन शंभूराजे व्यवहारे यांनी केले. सदर स्पर्धेत एकूण ३२ संघ खेळविले जाणार आहेत.
सन्मानचिन्हासह प्रथम क्रमांकास ५१,८८८ द्वितीय ३१८८८ तृतीय २१८८८ तर चतुर्थ क्रमांकास ११८८८ अशी रोख पारितोषके दिली जाणार आहेत.क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी वैभव मोरे,मोडनिंब आउटपोस्टचे आसिफ आतार,डॉ. प्रविण पाटील, राष्ट्रवादी युवती ता. अध्यक्ष ऋतुजा सुर्वे, डॉ. संतोष दळवी,सुनील ओहोळ, उपसरपंच आमित कोळी, प्रा. संतोष लोकरे, उद्योजक पोपट दोभाडा, निलेश गुरसळकर,राहुल गांधी, विशाल पाटील, यश पाटणे, विनय पाटील,आप्पासाहेब पाटील,कंट्रेक्टर हर्षवर्धन यादव, माणिक कणसे, समाधान सुर्वे, सुकुमार मुळीक, बालाजी सुर्वे, उमेश शिंदे, आदी उपस्थित होते. स्पर्धेसाठी रोहित गडेकर, निलेश ढेकळे, अनिकेत गुरव, बबलू गिड्डे, पप्पू शेंडगे, महादेव ओहोळ, प्रशांत सुर्वे, सागर मोरे यासह संदीप धर्मे, विनोद गायकवाड, अक्षय केदार, बाबा सितारे, सुहास चव्हाण यांनी सहकार्य केले.स्पर्धा यशस्वीतेसाठी वैभव मोरे, महेश जाधव, आसिफ आतार, कुंदन कदम, निखिल निचाळ, संताजी पाटील , पंकज गायकवाड, सागर नलवडे व्हीसीसी क्रिकेट क्लब, एमसीसी क्रिकेट क्लब आणि युनिक अकॅडमी यांनी परिश्रम घेतले.
0 Comments