मोहोळ मतदार संघातील भटक्या विमुक्त जाती व जमाती मधील वंचित
लाभार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले वाटप
मोहोळ(कटूसत्य वृत्त):-मौजे वडवळ ता.मोहोळ येथील श्री नागनाथ देवस्थान भक्तनिवास येथे मोहोळ मतदार संघातील भटक्या विमुक्त जाती व जमाती मधील वंचित लाभार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले वाटप व मतदार नोंदणी कार्यक्रम आयोजित केला होता. सदर कार्यक्रमासाठी श्रीकांत देशपांडे (भा. प्र. से.) मा अप्पर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य, यांच्या हस्ते कार्यक्रमाचें उद्घाटन झाले. या कार्यक्रमासाठी श्री गणेश निराळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी सोलापूर, सचिन इथापे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पंढरपूर विभाग, अजिंक्य गोडगे उपविभागीय अधिकारी मोहोळ विभाग पंढरपूर, आणि सचिन मुळीक सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार मोहोळ यांची आवर्जून उपस्थिती होती. भटक्या विमुक्त जातींसाठी त्यांच्या हक्काच्या आणि गरजू सोयी सुविधांसाठी अपार कष्ट करणारे भटक्यांचे आराध्य दैवत बाळकृष्ण रेणके अण्णा ,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि संपूर्ण तालुका भर भटक्यांच्या दारात जाऊन त्यांच्या हलाखीची परिस्थितीची जाणीव करून घेऊन त्यांचे प्रश्न मिटवणे आणी महसुली दाखले मिळवण्यासाठी आलेल्या प्रश्नासाठी माननीय प्रांताधिकारी साहेब आणि तहसीलदार साहेब यांचा पाठपुरावा करणे आणि आजच्या महसूल विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमांसाठी तालुक्यातील सर्व भटक्या विमुक्त जातीच्या जनतेला गोळा करणे अशा अनेक गोष्टी करणारे सिद्राम नाना पवार यांनी कार्यक्रम पार पडणेस मोलाचे सहकार्य केले.तसेच कार्यक्रम पार पाडणे साठी सुरेश आप्पा शिवपुजे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, सर्जेराव पाटील लांबोटी, भाऊसाहेब शिंदे कोळेगाव, बाळासाहेब दांईगडे हे कोळेगाव, दगडू निंबाळकर पेनुर, दत्तात्रय सूर्यवंशी अनगर, प्रकाश पवार कोळेगाव, मारुती वाघमोडे लांबोटी, किसन धोत्रे चिंचोली काटी इ. कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.

0 Comments