Hot Posts

6/recent/ticker-posts

कारखानदारांनी जळलेल्या उसाची कपात त्वरित थांबवावी:युवा सेनेची मागणी

 कारखानदारांनी जळलेल्या उसाची कपात त्वरित थांबवावी

:युवा सेनेची मागणी

सोलापूर(कटूसत्य वृत्त):-शिवसेना युवा सेना सचिव वरून सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना विभागीय सचिव अक्षय ढोबळे व युवा सेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख उत्तम आयवळे यांच्या आदेशाने युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे युवा सेना तालुका प्रमुख सुभाष काकडे युवा सेना शहर प्रमुख शेखर खिलारे यांच्या वतीने अकलूज चे प्रांत अधिकारी विजया पांगारकर म्यॅडम यांना निवेदन देण्यात आले .शेकऱ्यांच्या जळालेल्या ऊसाची कारखानदार 50 ते 200 रु कपात करत आहेत ती कपात त्वरित थांबवण्यात यावी अशी मागणी युवा सेनेच्या वतीने निवेदनात करण्यात आली.

 सध्या शेतकऱ्यांचा ऊस वाहन मालक कारखान्यास तोडून नेत आहेत . वाहन मालक सर्यास ऊस जाळून तोडत आहेत . ऊस जाळून तोडल्या मुळे ऊसाचे टनेज चे प्रमाण घटते व कारखानदार जळीत ऊस असल्या मुळे एका टनास 50 ते 200 रुपये कपात करत आहेत .जळीत ऊसाची कपात कारखनदाराकडून त्वरित थांबण्यात यावी व शेतकऱ्यांना न्याय द्यावा .वाहन मालक शेकऱ्यांना भीती घालतात तुमच्या उसात सर्प आहेत उसात पाचटच जास्त आहे उसाच्या फडात घाण च जास्त आहे त्यामुळे आम्ही तुमचा ऊस तोडू शकत नाही आम्ही तुमचा ऊस नाही तोडला तर तो शेतात तसाच राहील अशी भीती वाहन मालक शेतकऱ्यांना घालतात . तसेच कारखानदार शेतकऱ्यांकडून अर्ज लिहून घेतात की माझा ऊस खराब आहे किंवा जळून चालला आहे किंवा पाण्याची कमतरता आहे त्यामुळे मी जाळून तोडण्यास काहीही हरकत नाही व आपल्या नियमां प्रमाणे जळीत ऊसाची जी होणारी कपात असेल ती कपात करण्यास माझी काहीही हरकत नाही असे लिहून घेतात . या भीती पोटी तळ हाताच्या भोडा प्रमाणे जपलेला ऊस डोळ्या देखत पेटवून देऊन तोडला जातो व कारखान्यास नेला जातो. कारखानदाराने ऊस जाळून तोडावा किंवा कसाही कारखान्यास तोडून नेवावा पण एक रुपयाचीही कपात करू नये अशी मागणी युवा सेनेच्या वतीने करण्यात आली यावेळी युवा सेना अकलूज उपशहर प्रमुख युवराज पवार प्रशांत पराडे सागर साळुंखे विकास भोई शुभम भोई मोन्या भोई इ शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते

 कारखानदाराने शेकऱ्यांकडून ना हरकत ऊस बिल कपात चे जरी अर्ज घेतले असले तरी  सोलापूर जिल्ह्यातील जळीत ऊसाची एक ही रुपया कपात करू नये व जे कारखानदार जळीत ऊसाची कपात करत आहेत त्यांच्या वरती त्वरित कारवाई करण्यात यावी अन्यथा युवा सेना रस्त्यावर्ती उतरून उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा ईशारा युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी दिला आहे

Reactions

Post a Comment

0 Comments