Hot Posts

6/recent/ticker-posts

धैर्यशील मोहिते पाटील यांच्या दौऱ्याला माढा मतदार संघात मिळतोय मोठा प्रतिसाद

 धैर्यशील मोहिते पाटील यांच्या दौऱ्याला माढा मतदार संघात मिळतोय मोठा प्रतिसाद

टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-माढा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी कडून रणजीत सिंह निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. परंतु अद्यापही माढाया बाबतचा तिढा सुरूच असल्याबाबतचे पाहावयास मिळत आहे अकलूजच्या मोहिते पाटील परिवाराने जनमत जाणून घेण्यासाठी संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघात गाव भेट दौरे व भेटीगाठीसाठी जोर दिला आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह शिवतेजसिंह मोहिते पाटील व परिवारातील काही सदस्यांनी मतदारसंघात दौरे सुरू केले आहेत. या दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पहावयास मिळत आहे सोलापूर जिल्ह्याला पुन्हा एकदा मोहिते पाटील पाहिजे असाही सूर जन्मतातून दिसून येत आहे माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे गाव भेट दौऱ्यानिमित्त कुटे पार्टीचे प्रमुख नेते व माजी सरपंच प्रमोद कुटे यांची धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज भेट घेतली. टेंभुर्णी शहरातील अनेक ग्रामस्थ     माजी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते या भेटीमुळे टेंभुर्णी शहरात माढा तालुक्याचे आमदार बबनराव शिंदे यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे सुभाष कुटे यांचे पुत्र वैभव कुटे व टेंभुर्णी चे माजी सरपंच प्रमोद कुटे यांच्या घरी धैर्यशील मोहिते पाटील यांनी भेट दिल्याने टेंभुर्णी शहरात उलट सुलट राजकीय चर्चा होताना दिसत आहे. स्वर्गीय कृष्णात बोबडे यांचा गट म्हणजे मोहिते पाटील यांना मानणारा गट असे समजले जात होते परंतु स्वर्गीय कृष्णा दादा बोबडे गेल्यानंतर त्यांचे पुत्र योगेश बोबडे हे भाजपचे काम करत असल्याने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे काम करीत असल्याने माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे हे महायुती सरकार मध्ये भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे गट एकत्र आल्याने टेंभुर्णीचे कट्टर विरोधक गट बोबडे गट व कुटे गट  यामधील कुटे गट हा पूर्वीपासून आमदार बबनदादा शिंदे यांचा गट म्हणून ओळखला जातो. परंतु मागील चार-पाच महिन्यापूर्वी टेंभुर्णी  ग्रामपंचायत इलेक्शन मध्ये कुटे पार्टी व तिसरी आघाडी यांचे मतभेद मिटले गेले नाहीत मागील पंधरा वर्षापासून सत्तेत असलेली कुटे पार्टी यांना फक्त एका जागेवरती समाधान मानावे लागले व तिसऱ्या आघाडीला प्रथमच सहा जागा मिळाल्या व  बोबडे पार्टी ही सत्तेत आली व बोबडे यांचा सरपंच झाला. त्यामुळे सध्या तरी कुटे पार्टी नाराज असल्याचे पहावयास मिळत आहे त्यांनी टेंभुर्णी ग्रामपंचायत चा राग मनात धरून माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे सोडून मोहिते पाटील गट जवळ केल्याची चर्चा सध्या टेंभुर्णी शहरात होत असून कुटे पार्टीचा राजकीय वर्तुळात पहिल्यांदाच मोहिते पाटील यांनी भेट दिल्याने टेंभुर्णी शहरात चर्चेला उधाण आले आहे प्रथमच धैर्यशील मोहिते पाटील यांनी टेंभुर्णी चे माजी सरपंच व कुटे पार्टीचे प्रमुख प्रमोद कुटे व विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक प्रभाकर कुटे यांच्या घरी भेट दिल्याने त्यावेळी त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला यावेळी वैभव कुटे, अकोले गावचे भारत नाना पाटील विजय कोकाटे, हेही उपस्थित होते. मात्र याबाबत काय होणार याकडे टेंभुर्णीकरांची लक्ष लागून राहिले आहे......
Reactions

Post a Comment

0 Comments