सैनिक स्कूल परीक्षेत केंद्रीय प्राथमिक शाळेचे 19 विद्यार्थी उत्तीर्ण
कसबे तडवळे.(कटूसत्य वृत्त):- धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे गावातील जिल्हा परिषद आदर्श केंद्रीय प्राथमिक शाळेतील 20 पैकी 19 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सहा विद्यार्थी 200 गुणांच्यापुढे आहेत.शाळेचा शेकडा निकाल 95 टक्के लागला असून 2023-24 सालाची ही सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा 28 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आली होती.सदरील परीक्षेत मुलांच्या शाळेतील प्रेम शिंदे,प्रज्वल जमाले,रिजवान कोतवाल,शंभू करंजकर,शशांक जगताप,अथर्व माने,आशिष बोरकर,विनायक कुदळे,विराज काळे,अथर्व हंकारे,हरीओम जगताप,यशवंत पारडे,पृथ्वीजित जमाले,व्यंकटेश काळे,रामकृष्ण तवले,श्रेयश थोडसरे,आर्येश ढमाले,शामसुंदर मुळे,शिवराज करंजकर हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.नवोदय,शिष्यवृत्ती याप्रमाणेच सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत मुले यश संपादन करू लागले आहेत. या विद्यार्थ्यांना दत्तात्रय मगर, अजय जानराव, बाळासाहेब जमाले, रामकृष्ण ढवळे,अंबिका कोळी,वैशाली पवार, अंजली डुमणे,हेमलता चांडगे,शरयु पवार यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक केशव पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष,सर्व सदस्य, शिक्षण प्रेमी नागरिक व पालक यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले आहे.
.jpg)
0 Comments