Hot Posts

6/recent/ticker-posts

वाशिंबे येथील शरदचंद्रजी पवार विद्यालयातील एस.एस.सी विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा व स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न

 वाशिंबे येथील शरदचंद्रजी पवार विद्यालयातील एस.एस.सी विद्यार्थ्यांचा

 शुभचिंतन सोहळा व स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न

वाशिंबे(कटूसत्य वृत्त):-शरदचंद्रजी पवार विद्यालय वाशिंबे येथील एस.एस.सी विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा व पारितोषिक वितरण,वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न झाला. विद्यादेवता सरस्वतींच्या पुजनाने मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरूवात झाली. विविध गीतावरती विद्यार्थ्यांनी उत्कृष्टपणे नृत्य सादर केले.यामध्ये देशभक्तीपर गाणी, मुकनाट्य,गोंधळगीत,लोकनृत्य,लावणी,शेतकरी आत्महत्या,व्यसनमुक्ती, मोबाईलचा अतिवापर,राजे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज देखावा,यातुन सामाजिक हिताचा सुंदर संदेश देणारा कलाविष्काराचे सादरीकरण केले.यावेळी माजी विद्यार्थी, मुलांचे पालक-माता मोठ्या संख्येने उपस्थित होते.मुलामुलींच्या कलागुणांना  कौतुकांची थाप देत बक्षिसे दिली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वासुदेव फर्निचरचे मालक राशीन येथील उद्योजक मेघराजजी बजाज उपस्थित होते.त्याच्यांकडून सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.तर व्याख्याते रविंद्र येवले सर सेवानिवृत्त प्राचार्य मुधोजी हायस्कूल फलटण यांनी विद्यार्थ्याना अनमोल मार्गदर्शन केले.

प्रमुख उपस्थितीत विद्यालयाचे अध्यक्ष रामदास बप्पा साळुंके, विकास काळे केंद्रप्रमुख जि.प.शाळा.केत्तूर २, दिलावर मुलाणी सर प्राचार्य नेताजी सुभाष विद्यालय केत्तूर-२,सुभाष भोईटे सचिव जे.के चॉरिटेबल ट्रस्ट,वाशिंबे, अनिल झोळ सर राजेश्वर विद्यालय राजुरी,नानासाहेब मोहिते मुख्याध्यापक जि.प.शाळा सोगांव,बाळासाहेब भिसे पत्रकार सहशिक्षक छत्रपती शिवाजी हायस्कुल कोर्टी, विजय मारकड प्राचार्य दत्तकला आयडियल स्कूल केत्तूर-१,विलास दुरंदे मुख्याध्यापक जि.प.शाळा वाशिंबे,मा.चेअरमन बळीराम झोळ,विजय साळुंके अध्यक्ष भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ,वाशिंबे,नवनाथ बापू झोळ संचालक करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती,अमोल भोईटे अध्यक्ष जे.के.फाऊंडेशन,पत्रकार सुयोग झोळ,विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश यादव,सर्व शिक्षक, शिक्षिका,कर्मचारी वर्ग आदी मान्यवर उपस्थित होते.इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांकडून विद्यालयातील ५५० विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन हरी शिंदे सर व निवेदक रणजित शिंदे यांनी केले.आभार महेश कुलकर्णी सर यांनी मानले.

Reactions

Post a Comment

0 Comments