छावा संघटनेच्या वतीने ना. रामदास आठवले यांचा सत्कार....!
चाकण येथे महिला भगिनींच्या हस्ते झाला सत्कार...!!
पुणे (कटू सत्य वृत्त): -रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचा चाकण येथे अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने छावा संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संगीताताई नाईकरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य सत्कार आणि सन्मान करून चाकण नगरीमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत करण्यात आले.
महिला भगिनींनी केलेल्या सत्कार सोहळ्या विषयी बोलताना ना.रामदास आठवले यांनी अनेक नव्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. आणि या सत्कारामुळे आपण भारावून गेल्याचं सांगितलं. यावेळी छावा संघटनेच्या अर्चनाताई पडवळ, आशाताई फडके रूपालीताई नानेकर ,पूजाताई नेवाळे शन्नोताई शेख, महानंदाताई चव्हाण, अनिताताई चव्हाण, रंजनाताई चन्ने, सुधाताई आगरकर, लक्ष्मीताई वाळुंज, निर्मलाताई इंगळे, हरियालीताई कौर , कविताताई लष्करे, आशाताई पवार, इंदोरेताई, भाग्यश्रीताई पाटील, प्रविण करपे, आकाशभाऊ लगाडे आधी सह बहुसंख्य महिला आणि नागरिक उपस्थित होते.

0 Comments