वंदे मातरम् संघटनेच्या वतीने दि. 11 जानेवारी रोजी"सोलापुर मार्शल लॉ
आणि चार हुतात्मे" या पुस्तकांचा पुनर्प्रकाशन सोहळा.....!
अध्यक्ष लेशपाल जवळगे यांची माहिती....!!
सोलापूर (कटू सत्य वृत्त): -हुतात्मा दिनाच्या निमित्ताने हुतात्मा नगरीत दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी पाच वाजता हुतात्म्यांना आदरांजली वाहून व्यं.गो. अंदुरकर लिखित " सोलापूर मार्शल लॉ आणि चार हुतात्मे " या पुस्तकांचा पुनर्प्रकाशन सोहळा हिराचंद नेमचंद वाचनालय हुतात्मा चौक येथे वंदे मातरम संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आल्याची माहिती वंदे मातरम् संघटनेचे प्रदेशाध्यक्ष लेशपाल जवळगे यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पुढे बोलताना जवळगे म्हणाले की, " देशाने मला काय दिले यापेक्षा मी देशाला काय देऊ शकतो ही विचारधारा घेऊनच वंदे मातरम् संघटना कार्यरत असून त्यासाठीच हा सोहळा क्रांतिकारकांच्या गावांमध्ये साजरा होत आहे.
1876 मध्ये बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेल्या वंदे मातरम् या गीताला 2026 साली दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त वंदे मातरम् संघटनेच्या वतीने पुढची तीन वर्ष संपूर्ण देशभरात राष्ट्रीय आणि सामाजिक ऐक्याची चळवळ उभा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार असून त्याची सुरुवात क्रांतिकारकाच्या गावी अथवा स्मृतिस्थळी भेट देऊन तिथल्या युवकांच्या सोबतीने सामाजिक व राष्ट्रीय एकाचा कार्यक्रम हाती घेण्याचा मानस आहे. त्यानिमित्त क्रांतिकारक तसेच देशभक्तांच्या जीवनावरील एकूण 150 पुस्तके प्रकाशित करण्याची योजना आहे. त्याचा प्रारंभ क्रांती भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या हुतात्मा नगरी सोलापूर शहरातून हुतात्मा दिनाच्या पार्श्वभूमीवर होणार आहे. आणि देशातील हा पहिलाच कार्यक्रम आणि उपक्रम आहे.
त्यामुळे सोलापूर शहर जिल्ह्यातील युवकांनी या चळवळीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. सोलापूर मध्ये महात्मा गांधीजींच्या अटकेनंतर ब्रिटिशांविरुद्ध मे 1930 मध्ये मोठे जनांदोलन झाले. तेव्हा आंदोलन वंदे मातरम् च्या घोषणा देत होते. या क्रांतिकारी लढ्याच्या माध्यमातून सोलापूरला चार दिवसाचे स्वातंत्र्य मिळाले होते. देशात सर्वप्रथम सोलापूर वर तिरंगा झेंडा फडकवला होता. ज्या सोलापूर च्या आंदोलनाची दखल ब्रिटिश पार्लमेंटला घ्यावी लागली होती.याचा आज परिणाम संपूर्ण देशात फक्त सोलापुरात मार्शल लागू करण्यात आला. आणि या घटनेला जबाबदार म्हणून सोलापुरातील मलाप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, जगन्नाथ शिंदे, आणि अब्दुल रसूल कुरबान हुसेन या चार हुतात्म्यांना 12 जानेवारी 1931 रोजी फाशी देण्यात आली. देशभरात अशी राष्ट्रीय आणि सामाजिक एक्याची उदाहरण खूप मोजकी आहेत त्यामध्ये सोलापूरचा इतिहास आहे.
आज पुन्हा काही राष्ट्रविरोधी शक्ती जातपात, धर्म किंवा प्रदेश यांचा खोटा अभिमान दाखवून आपापसात फूट पाडून राष्ट्रीय ऐक्य धोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. जे या देशाला अजिबात परवडणारे नाही. सामान्य नागरिक सुख आणि समाधानात राहण्यासाठी वंदे मातरम् संघटना सुरुवातीपासूनच काम करत असून संघटनेची भूमिका स्पष्ट आहे. वंदे मातरम् संघटना कायम या शक्तीच्या विरोधात निडरपणे उभी राहिली आहे. हे कार्य करत असताना संघटनेचे अनेक कार्यकर्त्यांवर हल्ले झाले आहेत. तर पुण्यातील दत्तात्रय गायकवाड यांनी पंजाब मध्ये शीख कुटुंबाला वाचविताना आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. आज पुन्हा एकदा वंदे मातरम संघटना नव्या जोमाने आणि देशभक्तीचा विचार इथल्या मातीत आणि तरुणांच्या नसानसात भिनवण्यासाठी या राष्ट्रविरोधी शक्तीच्या विरोधात उभी राहिली राहत आहे.
या कार्यक्रमासाठी शहीद भगतसिंग यांचे पुतणे सरदार किरणजीत सिंग, क्रांतिवीर बटुकेश्वर दत्त यांची मुलगी भारतीय दत्त बागची तसेच देशाचे माजी गृहमंत्री व माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि सोलापूर मधील हुतात्म्यांचे वंशज प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी तमाम सोलापूरकरांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन वंदे मातरम् संघटनेच्या वतीने लेशपाल जवळगे यांनी केलं आहे.
.jpg)
0 Comments