Hot Posts

6/recent/ticker-posts

चार हजार जोड्यांचा अतिरुद्राभिषेक कार्यक्रमाचे आयोजन- संजय कोकाटे

 चार हजार जोड्यांचा अतिरुद्राभिषेक कार्यक्रमाचे आयोजन-  संजय कोकाटे


टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- टेंभुर्णी येथील बारवे मळा येथील महामार्गालागत असलेल्या पुरातन महादेव मंदिरात सुमारे चार हजार जोड्यांचा अतिरुद्राभिषेक कार्यक्रमाचे आयोजन ०७ फेब्रुवारी ते ०८ मार्च या दरम्यान करण्यात आले असल्याची माहिती संजय कोकाटे यांनी दिली आहे.पत्रकार परिषदेत पुढे बोलताना संजय कोकाटे म्हणाले की,टेंभुर्णीत ११ महादेव मंदिरे आहेत.त्यापैकी हायवेवरील बारवे मळा येथील हे एक प्रमुख मंदिर असून मंदिरातील मूर्त्यांची तोडफोड झाल्याने चार-पाच वर्षांपूर्वी या मंदिराचा जोर्णोद्धार करण्यात आला होता.मात्र त्यावेळी कोरोनाचे संकट असल्याने रुद्राभिषेक करण्यात आले नव्हते.यावेळी ते म्हणाले की,दररोज सकाळी ९ वा.पासून संध्याकाळी ९ वा.पर्यंत पन्नास भाविक पती-पत्नीच्या जोड्यांच्या चार बॅचेस याप्रमाणे दररोज दोनशे जोड्यांचा अतिरुद्राभिषेक होणार आहे.या सर्वांना चाळीस ते पन्नास ब्राह्मणांचा गट मंत्रोच्चार व होम हवन,शिवलिंगाची आरती करणार आहोत.अतिरुद्राभिषेक झालेल्या सर्वांना संपुर्ण पोशाख व महादेवाची प्रतिमा भेट म्हणून देण्यात येणार असून सर्व उपस्थितासाठी महाप्रसादाचे आयोजन ही केलेले आहे.यासाठी सकाळची व संध्याकाळी शेवटची बॅच ही टेंभुर्णी व परिसरातील असणार आहे.तर मधील दोन बॅचेस या दूरवरून आलेल्या भाविकांसाठी राखीव असणार आहेत.आपल्या हातून समाजाची काहीतरी सेवा घडावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले असून या कार्यक्रमाचा सर्व भाविक-भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन ही शेवटी कोकाटे यांनी केले आहे.

"या महादेव मंदिराचा जीर्णोद्धार करताना तामिळनाडू येथील महाबलीपुरम येथून सर्व पाषाणाच्या मूर्ती आणून त्यांची सन्मानपूर्वक प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे.यामंदिरात शिवपार्वती, विठ्ठल-रखुमाई,दत्त,गणेश,कार्तिक स्वामी,कालभैरवनाथ व विष्णू,नागदेवता आदी देवतांच्या मूर्ती ही आहेत.शिवपार्वती मूर्ती असणारे हे एकमेव महादेव मंदिर आहे."

यावेळी सुधीर महाडिक,नागेश बोबडे,रामभाऊ टकले,संतोष ताबे,सुनील आळंदे,बासुभाई मुलाणी,शशिकांत देशमुख,दादादो कदम,सुदर्शन गायकवाड,विशाल गायकवाड हेही उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments