Hot Posts

6/recent/ticker-posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील तमाम मराठा आरक्षणा संबंधी आपली भूमिका जाहिर करवी

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील तमाम मराठा आरक्षणा संबंधी आपली भूमिका जाहिर करवी

मराठा विद्यार्थ्यांसाठीचे वस्तीगृह लवकर बांधून जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणात आणावे

मराठा क्रांती मोर्चाची मागणी

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  मराठा समाजाला 50% च्या आतून ओबीसी मध्ये आरक्षण मिळावे यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील शांततेत आंदोलन करत आहेत त्यांच्या काही मागण्याला राज्य शासन सकारात्मक प्रतिसाद देत आहे परंतु सरसकट मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. गरजवंत मराठ्यांची सरकारला घातलेली साथ पाहता त्यांनी मराठ्यांचा आस्थेने आणि सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य तो न्याय द्यावा. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आणि महाराष्ट्रातील तमाम मराठ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागील काळात महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असताना त्यांनी मराठा आरक्षणावर बोलावे अशी मागणी केली होती परंतु त्यावर त्यांनी अद्याप भाष्य केलेले नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठा समाजाला 50% च्या आतून ओबीसी आरक्षण द्यावे या मराठा समाजाच्या मागणीचा सकारात्मक विचार करून राज्य सरकारला योग्य ते आदेश देऊन आपण मराठा समाजासोबत आहोत ही भूमिका स्पष्ट करावी. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होत महाराष्ट्रातील जनतेला भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केले होते त्या आव्हानाला प्रतिसाद देत महाराष्ट्राने भाजपाला झुकते माप दिले. परंतु अद्याप पर्यंत महाराष्ट्रातील मराठा समाजाची मागणी मान्य झाली नाही त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या 19 जानेवारी सोलापूर दौऱ्यात त्यांनी मराठा आरक्षणा संदर्भात राज्य सरकारला आदेश द्यावेत. या आशयाचे निवेदन सोलापूर ते पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे दिले व मराठा समाजातील आमची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पोहोचवण्याची मागणी केली. तसेच या निवेदनाची प्रत पंतप्रधान कार्यालय दिल्ली येथे फॅक्स करण्यात आली आहे.

सोलापूर मध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गेल्या सहा-सात वर्षापासून गरजवंत विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज असे वस्तीगृह व्हावे आणि जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली चालवावे यासाठी लढा चालू आहे परंतु अद्याप पर्यंत प्रशासन व सरकारकडून या संदर्भात फक्त आश्वासनच देण्यात आली होती आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे यासंदर्भात निवेदन दिले असता त्यांनी पुढील दौऱ्यामध्ये या संदर्भामध्ये लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन दिले आहे.

यावेळी मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक राम जाधव, राजाभाऊ कुसेकर, शेखर फंड, प्रशांत बाबर, निलेश शिंदे, सचिन गोडसे, दीपक पेठकर, सावंत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments