Hot Posts

6/recent/ticker-posts

हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत टेंभुर्णी बस स्थानकाची पाहणी

 हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक

 अभियानांतर्गत टेंभुर्णी बस स्थानकाची पाहणी


टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यामधील टेंभुर्णी या ठिकाणी माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत टेंभुर्णी बस स्थानकाची 16 जानेवारी रोजी मंगळवार तिसऱ्यांदा पाहणी करण्यात आली. यावेळी सर्व विभागाची माहिती घेण्यात आली  स्वच्छतेची पाहणी करण्यात आली. यामध्ये विभाग नियंत्रक पुणे विभाग यांच्या अधिपत्याखालील समितीमध्ये विभाग नियंत्रक कैलास पाटील विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी कैलास भगत व विभागीय वाहतूक अधीक्षक गोविंद जाधव तसेच प्रवासी मित्र मोतीराम जाधव व पत्रकार अनिल जगताप हेही उपस्थित होते सदर समितीने बस स्थानकामधील स्वच्छता स्थानकावरील कार्यालय वाहतूक नियंत्रण कक्ष प्रवासी प्रसाधन ग्रहाची स्वच्छतेची तपासणी करण्यात आली सदर समिती बस स्थानकावरील प्रवाशा करता असलेल्या सोयी सुविधाबद्दल तपासणी केली बसेसची स्वच्छता चालक वाहक विश्रांती ग्रहाची स्वच्छता तपासणी करण्यात आली त्याचप्रमाणे बस स्थानकावरील स्वच्छता नोंदवही प्रवासी व उत्पन्न वाढवा अभियान नोंदवहीची तपासणी करण्यात आली सदर पाहणीच्या वेळी आगरी व्यवस्थापक रत्नाकर लाड स्थानक प्रमुख विजय हांडे वाहतूक नियंत्रण सविता चव्हाण चालक संजय नवले प्रवासी बांधव चालक वाहक उपस्थित होते मयूर काळे, उत्तम भोसले यावेळी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments