माढ्याचा पेपर शरद पवारांनी सोडवायला दिला तर सोडवणार व पास देखील होणार-अभिजीत पाटील
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रवादी काँग्रेस माढा तालुका अध्यक्ष औदुंबर महाडिक देशमुख यांनी पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार सन्मान सोहळा टेंभुर्णी येते साईकृपा हॉटेलमध्ये आयोजित केला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सध्या पाच तालुक्यांची जबाबदारी सांभाळत असलेले व पाच कारखान्याची जबाबदारी सांभाळत असलेले अभिजीत आबा पाटील यांनी पत्रकारांशी अनेक प्रश्नांचा उलगडा केला टेंभूर्णी येथील एमआयडीसीत स्थानिकांचे उद्योग किती आहेत स्थानिकांना रोजगार किती मिळतो हे देखील पाहणे गरजेचे आहे.
उजनी धरण पाणी वाटप विषयी मत विचारले असता अभिजीत पाटील म्हणाले की उजनी धरण हे अत्यंत प्रदूषित झाले असून त्याचा टीडीएस 3000 वर पोहोचला आहे हे पाणी आरोग्यास तसेच शेतीचा पोत सुद्धा खराब करत आहे तसेच पाणी वाटपात होत असलेले नियोजन चुकीचे आहे मला निवडून द्यावे मी संपूर्ण जिल्ह्याला पाणी वाटपाचे वेळापत्रक करून पाणी पुरवतो 123 टीएमसी असलेले उजनी धरण सोलापूर जिल्ह्याला फक्त 53 टीएमसी पाणी लागते नियोजना अभावी पाण्याचा मनमानी वापर करून धरण रिकामे केले जात आहे.
माढ्याचा पेपर जर आदरणीय शरद पवार साहेबांनी सोडवण्यास दिला तर पेपर सोडवणार असून व त्यात पास सुद्धा होणार आहे. मी लोकसभेपेक्षा विधानसभेला इच्छुक असून सगळे स्वार्थापोटी शरद पवारांची साथ सोडून व पक्ष सोडून गेले परंतु मी निष्ठेपायी या पक्षात राहिलो आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माढा तालुका अध्यक्ष औदुंबर महाडिक देशमुख यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते तर सूत्रसंचालन राजाभाऊ पाटील यांनी केले होते यावेळी उपस्थित माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष आबासाहेब साठे,चव्हाणवाडी चे विद्यमान सरपंच नवनाथ शिंदे,कुर्डूचे विद्यमान सरपंच बाबासाहेब जगताप,टेंभुर्णी ग्रामपंचायत सदस्य सुधीर पाटील,माढा शहराध्यक्ष जितेंद्र जमदाडे,पांडुरंग महाडिक,बाबासाहेब महाडिक,मृणाल महाडिक, स्वप्निल शिंदे,बाळासाहेब राऊत,संदीप कुटे, विष्णू महाडिक,संजय नाना महाडिक,संभाजी टिपरे,प्रमोद शिंदे,स्वप्नील ननवरे,टेंभुर्णी व टेंभुर्णी परिसरातील पत्रकार बांधव उपस्थित होते.

0 Comments