Hot Posts

6/recent/ticker-posts

सनराइज् इंग्लिश मीडियम स्कूलचा क्रीडा दिन मोठ्या उत्साहात पार.

 सनराइज् इंग्लिश मीडियम स्कूलचा क्रीडा दिन मोठ्या उत्साहात पार.


टेंभुर्णी, (कटूसत्य वृत्त):-श्री माऊली शिक्षण संस्था संचलित, सनराइज् इंग्लिश मीडियम गुरुकुल स्कूल टेंभुर्णी यांचा १४वा वार्षिक क्रीडा दिन दिनांक ३० डिसेंबर२०२३ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात दुपारी ठीक दोन वाजता झाली कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान हे टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पी.एस.आय जोग साहेब  यांनी भुषवले तसेच कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून टेंभुर्णीचे क्रीडा शिक्षक प्रा.रवी कुनाळे सर, आणि संत सावतामाळी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक हरिदास रणदिवे सर हे लाभले.या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष  योगेश (बाबाराजे) कृष्णांत बोबडे, संस्थेच्या सचिवा शिवमती सुरजाताई योगेश बोबडे  वेळात वेळ काढुन कार्यक्रमास उपस्थित होत्या.तसेंच टेंभुर्णी, ग्रामपंचायतीचे सदस्य , पत्रकार बंधू , शिक्षक - पालक समितीचे सर्व सदस्य हे सर्व मान्यवर क्रीडा सोहळा पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार,सन्मान समारंभ करण्यात आला व क्रीडा दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.प्रथमतः विद्यार्थ्यांना वेगवेगळे ड्रिल सादर केले.  प्रीप्रायमरी ग्रुपने अम्ब्रेला ड्रिल ,  रेड हाऊस यांचे बांबू ड्रिल,  ब्ल्यू हाऊस यांचे रिबन ड्रिल ,  येलो हाऊस यांचे ओढणी ड्रिल,आणि ग्रीन हाऊस यांचे रिंग ड्रिल हे अप्रतिम ड्रिल विद्यार्थ्यांनी सादर केले.

यांनतर  स्कुल स्पोर्ट्स कॅप्टन,, हेड बॉय, हेड गर्ल व हाऊस कॅप्टन्स यांनी क्रीडा मशाल धावपट्टी वरून फिरवली. त्यानंतर चारही हाऊसच्या विदयार्थ्यांनी मार्च पास्ट अर्थात अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने संचलन सादर केले व प्रशालेच्या प्रिन्सिपल शाहिदा पठाण मॅडम यांनी खेळाडूंना क्रीडा शपथ (स्पोर्ट्स ओथ ) दिली तसेच अध्यक्षांच्या परवानगीने खेळाला सुरुवात झाली.या क्रीडादिनी  वेगवेगळ्या चोपन्न प्रकारच्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये अगदी लहान गटापासून इयत्ता दहावी पर्यंतच्या सर्व खेळाडूंनी सहभाग घेतलेला होता. प्रशालेने प्रत्येक विद्यार्थी खेळामध्ये सहभागी होईल याची काळजी घेतलेली होती.   यामध्ये हर्डल रेस , लिंबू चमचा , आईस्क्रीम रेस, अडथळा शर्यत , तीन पायाची शर्यत,, कॅप अँड गॉगल रेस, बटाटा शर्यत, सायकल रेस ,100 मीटर ,200 मीटर व 400 मीटर धावणे, कॅरट अँड बनी रेस, रिले रेस आशा अनेक खेळांचा समावेश करण्यात आलेला होता. हा संपूर्ण शिस्तबद्ध, न्ययनरम्य, भव्य आणि दिव्य क्रीडा सोहळा स्कुलच्या महत्वकांक्षी प्रिंसिपल व अकॅडेमीक डायरेक्टर सन्माननीय शाहिदा पठान यांच्या संकल्पनेतून व नेतृत्वाखाली याठिकाणी पार पडला.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. पूर्वी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट, खो -खो, कबड्डी व व्हॉलीबॉल या सामन्यांच्या विजेत्यांना ट्रॉफी प्रदान करण्यात आल्या.  यल्लो हाऊसने बाजी मारत स्पोर्ट्स चॅम्पियनशिप ट्रॉफी आपल्या नावे केली . सर्व विद्यार्थ्यानी जल्लोषामध्ये विजय साजरा केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शक्ती सोनवणे सर, अमरीन शेख  यांनी केले तर स्कोर कीपर म्हणून सचिन पवार सर यांनी काम केले.हा कार्यक्रम यशस्वी होण्या पाठीमागे स्कुलचे क्रीडा शिक्षक राहुल काळे सर व गणेश देवकते सर यांचीही भूमिका अतिशय महत्त्वाची होती. तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचेही खूप महत्त्वाचे योगदान लाभले.

कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन प्रशालेच्या प्रिन्सिपल  शाहिदा  पठान यांनी केले व कार्यक्रमाची सांगता झाली एकूणच कार्यक्रम खूप आनंदीमय आणि उत्साही वातावरणामध्ये, यशस्वीरित्या पार पडला.

Reactions

Post a Comment

0 Comments