Hot Posts

6/recent/ticker-posts

टेंभुर्णी प्रेस क्लबच्या नूतन अध्यक्षपदी गणेश चौगुले, उपाध्यक्षपदी अमरसिंह शेंडे तर सचिवपदी धंनजय मोरे बिनविरोध निवड

टेंभुर्णी प्रेस क्लबच्या नूतन अध्यक्षपदी गणेश चौगुले, उपाध्यक्षपदी

 अमरसिंह शेंडे तर सचिवपदी धंनजय मोरे  बिनविरोध निवड


टेंभुर्णी  (कटूसत्य वृत्त):-टेंभुर्णी प्रेस क्लबच्या सर्व सदस्यांची मिटिंग ३१ डिसेंबर रोजी टेंभुर्णी येथे होऊन त्यामध्ये दैनिक एकमतचे पत्रकार नूतन अध्यक्ष गणेश चौगुले  यांची एकमताने बिनविरोध एक वर्षासाठी निवड करण्यात आली. ही निवड झाल्याबद्दल दैनिक सकाळचे ज्येष्ठ पत्रकार संतोष पाटील यांनी शाल, श्रीफळ, फेटा बांधून सत्कार करुन अभिनंदन केले. तर दैनिक लोक सह्याद्रीचे संपादक पत्रकार अमरसिंह शेंडे यांची उपाध्यक्ष पदासाठ बिनविरोध निवड झाल्याबद्दल पत्रकार अनिल जगताप यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार धनंजय मोरे यांची सचिव पदासाठी बिनविरोध निवड झाल्याने त्यांचा सत्कार  पत्रकार सदाशिव पवार यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी मावळते सचिव  सचिन होदाडे यांनी प्रस्ताविक केले.टेंभुर्णी प्रेस क्लब बाबत पत्रकार  संतोष पाटील, अनिल जगताप, सदाशिव पवार, सोपान ढगे यांनी मार्गदर्शन केले.यावेळी सदाशिव पवार, आबासाहेब साळुंखे, सचिन होदाडे, सतीश काळे, सोपान ढगे, राजेंद्र केदार, विष्णू बिचकुले आदी पत्रकार उपस्थित होते. या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments