Hot Posts

6/recent/ticker-posts

कर्नाटकातल्या कॉंग्रेस आमदारावर ई.डी.चे छापे

 कर्नाटकातल्या कॉंग्रेस आमदारावर ई.डी.चे छापे

बेंगळुरू (वृत्त सेवा ):- कर्नाटक काँग्रेसचे आमदार  के. वाय नानजेगौडा आणि त्यांच्याशी संबंधित काही संस्थांच्या ठिकाणांवर सकाळी अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँड्रिंग तपासाचा एक भाग म्हणून छापे टाकले, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. 61 वर्षीय आमदार नानजेगौडा कर्नाटक विधानसभेत मालूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट अंतर्गत तपासाचा भाग म्हणून मालूर आणि कोलार जिल्ह्यांतील त्याच्या ठिकाणांचा आणि त्यांच्याशी संबंधित काही संस्थांचा शोध घेण्यात येत आहे,  असे सूत्रांनी सांगितले. स्थानिक पोलिसांच्या एफ.आय.आर.च्या आधारे ई.डी.चा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते. नानजेगौडा हे कोलार-चिक्कबल्लापूर दूध संघाचे अध्यक्षही आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पाश्‍र्वभूमीवर विरोधकांची सरकारे असलेल्या राज्यांमध्ये ई.डी. जाणिवपुर्वक सक्रिय करून विरोधकांना बदनाम करण्याचे कारस्थान केंद्र सरकारने रचले आहे असा आरोप कॉंग्रेससह अन्य राजकीय पक्षांनी या आधीच केला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments