Hot Posts

6/recent/ticker-posts

ढोक बाबुळगाव तालुका मोहोळ येथील पहिली महिला, पूजा चव्हाण हिची पी .एस .आय पदी नियुक्ती बद्दल सुरज वाचनालयाच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सत्कार करण्यात आला

 ढोक बाबुळगाव तालुका मोहोळ येथील पहिली महिला, पूजा चव्हाण   हिची

 पी .एस .आय  पदी नियुक्ती बद्दल सुरज वाचनालयाच्या वतीने सावित्रीबाई

 फुले जयंतीनिमित्त  सत्कार करण्यात आला


  मोहोळ (कटूसत्य वृत्त):-ढोक बाबळगाव तालुका मोहोळ येथील सुरज वाचनालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली यावेळी ढोक बाबळगाव येथील पहिली महिला पी एस आय पदी नियुक्ती झाल्याबद्दल  सुरज सर्वांचे सार्वजनिक वाचनालय वतीने नूतन पीएसआय पूजा चव्हाण , हिचा सत्कार करण्यात आला ,सत्काराला उत्तर देताना तिने म्हटले आहे भरपूर अभ्यास ,केल्याशिवाय कष्ट घेतल्याशिवायया पदाला पोहोचणे अवघड आहे,मी  कुठली हि शिकवणी व क्लास लावलेला नाही,विद्यार्थ्यांनी व मुलीने ,वाचनालयात भरपूर पुस्तके आहेत,त्याचा पुरेपूर फायदा घेऊनआपले करिअर घडवावे तसेच खेड्यात एवढ्या उत्कृष्ट प्रकारचे,वाचनालय असून चालक पदाधिकारी व ग्रंथपाल यांचे  आभार मानले कार्यक्रमाचे अध्यक्ष पंडित चव्हाण होते प्रमुख पाहुणे नाना गायकवाड भीमराव मुळे मंगेश चव्हाण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश चव्हाण यांनी केले प्रास्ताविक आभार भास्कर कुंभार यांनी मानले.

Reactions

Post a Comment

0 Comments