टेंभुर्णी शहरातील सर्व शासकीय जागेवरील व अंतर्गत सर्व रस्त्यावरील
दोन्ही बाजूने केलेले अतिक्रमण काढावे या मागणीसाठी मयूर अजिनाथ
काळे यांनी कार्यकर्त्यांसह आमरण उपोषण आंदोलन सुरू केले
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- मयूर काळे याने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की,टेंभुर्णी शहरात पुणे-सोलापूर महामार्ग,टेंभुर्णी शहरातील बाह्यवळण रस्ता,टेंभुर्णी अकलूज रस्ता,टेंभुर्णी-बेंबळे रोड,टेंभुर्णी-औद्योगिक वसाहत रोड,टेंभुर्णी सुर्ली रोड या रोडवर अनेक लोकांनी टपरी टाकून,बांधकाम करून,वीजेचे पोल,डिजिटल बॅनर,अवैध वाहतूक करणारी वाहने,दुकानातील साहित्य, हातगाडे,दुकानाचे साहित्य अशा पद्धतीने शहरात सर्व रस्त्यावर अतिक्रमण केलेले आहे.या अतिक्रमणामुळे अपघात होत असून वाहतुकीची कोंडी होत आहे.विकास कामाला अडथळा निर्माण होत आहे.यामधून जीवित हानी,वादाचे विषय होत आहेत.एक बाजूच्या व्यक्तीने अतिक्रमण केले की,समोरच्या बाजूच्या व्यक्ती कडून अतिक्रमण करण्यात येते.तसेच अतिक्रमणामुळे विकासाला बाधा पोहचते.प्रगती खुंटते असे म्हटले आहे.तसेच एवढे दिवस अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केलेल्या अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा ही मयूर काळे यांनी दिला आहे.उपोषणासाठी मयूर काळे,किशोर देशमुख,अभिषेक गायकवाड,सौरभ शेंडे,महेश देशमुख आदीजन बसले आहे.यावेळी संजय कोकाटे,ॲड प्रशांत देशमुख आदींनी भेट घेऊन उपोषण आंदोलनास पाठींबा दर्शविला आहे. तसेच या निवेदनाच्या प्रती प्रांत अधिकारी,तहसीलदार,गटविकास अधिकारी यांना ही निवेदन दिलेले आहे.
0 Comments