डॉ.कुमार लोंढे यांचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारखे आहे- महादेव जानकर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी मंत्री व विधान परिषदेचे सदस्य मा.महादेव जानकर यांनी माळशिरस तालुक्यातील चांदापुरी (सोलापूर) येथे सदाशिव देठे निवासी प्रशाला व ज्यू कॉलेज ला सदिच्छा भेट दिली या भेटीप्रसंगी त्यांनी शाळेचे संस्थापक डॉ.कुमार लोंढे यांच्याविषयी वरील गौरव ऊदगार व्यक्त केले सुरुवातीस भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन महादेव जानकर यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी बोलताना ते म्हणाले " बहुजन समाजातील व्यक्तीने शाळा,कॉलेज काढणे व चालवणे मुश्किल कार्य आहे .कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शिक्षण संस्थेमुळे मी शिकलो परन्तु आज शिक्षणात व्यवसायिकता आली आहे या बाबीस अपवाद डॉ लोंढे कुटुंबीय आहे त्यांनी या भागातील गरिबांची मुले शिकावी म्हणून हा प्रामाणिक प्रयत्न केला आहे शाळेला जागा देणारे देठे कुटुंबीय सुद्धा धाडसी आहे
या शाळेचे संस्थेचे मेडिकल कॉलेजमधे रूपांतर व्हावे.या संस्थेस सर्व प्रकारची मदत करण्यास मी तयार आहे यावेळी त्यांनी नुसतं आश्वासन न देता दहा लाख रु निधी संस्थेस देण्याचे जाहीर केले. बहुजन समाजाची,शेतकऱ्यांची पोरं शिकवा मी व माझा पक्ष आपल्या या विधायक कार्यास सोबत राहू असे अभिवचन ही त्यांनी दिले
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे संस्थेच्या सचिव डॉ.पंचशीला लोंढे, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य डी. जी. कांबळे,प्रा.संभाजी बनसोडे,रासपचे बाळासाहेब डोंगरे,सुहास पाटील, बाळराजे विरकर, माळशिरस कोर्ट चे ऍड धनंजय बाबर,रिपाई चे रणजित सातपुते,युवा उद्योजक भैय्या बाबर इ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.राजेश वायदंडे,प्रा.कारंडे,प्रा,अल्ता फ पठाण,प्रा.नितीन सरक,काळे मॅडम,अरुणा मॅडम,आकाश सरतापे इ नी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य के साठे यांनी केले तर शेवटी आभार संस्थापक डॉ.कुमार लोंढे यांनी मानले
0 Comments