आता पोस्ट ऑफिस मध्ये बँकेचे सुविधा मिळतील ;
संसदेत विधेयकाला मंजुरी
नवी दिल्ली (कटूसत्य वृत्त):- देशातील पोस्ट ऑफिसांना सेवा केंद्र आणि बँकांमध्ये रूपांतरित करण्यासाठी केंद्रीय दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सादर केलेले पोस्ट ऑफिस विधेयक २०२३ राज्यसभेत सोमवारी आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले.
पोस्टात सरकारने दिल्या १.२५ लाख नोकऱ्या पोस्टाच्या २६ कोटी खात्यांमध्ये १७ लाख कोटी जमा करण्यात आले आहेत. आजही सामान्य परिवारांना पैशांची बचत करण्यासाठी हा पर्याय आहे. पोस्ट कार्यालयांना व्यावहारिकदृष्ट्या बँकांमध्ये रूपांतरित करण्यात आले आहे. मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने आतापर्यंत १.२५ लाख लोकांना रोजगार दिले आहेत - अश्विनी वैष्णव, केंद्रीय दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री
.jpg)
0 Comments