गुरुवारी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक
सोलापूर(कटूसत्य वृत्त):-, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती व कार्यकारी समितीची बैठक गुरुवार दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 1.00 वाजता निजोजन भवन सभागृह सात रस्ता सोलापूर येथे आयोजित करण्यात आली आहे. तरी या बैठकीस खासदार,आमदार आदि लोकप्रतिनिधी तसेच नियोजन समितीचे सर्व अशासकीय सदस्य यांनी उपस्थित राहावे. सर्व शासकीय यंत्रणांनी बैठकीच्या अनुषंगाने सर्व आवश्यक माहितीसह बैठकीच्या वेळेपूर्वी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी केले आहे.
0 Comments