सध्याच्या हायटेक युगात तरुणाईला मैदानी क्रीडा प्रकाराचा विसर
-समाजकल्याण सहाय्यक संचालक मनीषा फुले
माढा(कटूसत्य वृत्त):- माढ्यातील हरहरे आश्रम शाळेमध्ये सोलापूर जिल्हा आश्रमशाळा क्रीडा महोत्सव अंतर्गत उत्तर विभागीय (माढा बार्शी करमाळा) कबड्डी स्पर्धेचे उद्घघाटन समारंभ मनीषा फुले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माढा नगरपंचायत च्या नगराध्यक्षा अॅड.मिनल साठे उपस्थित होत्या. स्पर्धेमध्ये माढा, करमाळा व बार्शी तालुक्यातील सर्व आश्रम शाळेतील जवळपास ६५ संघ सहभागी झाले होते.सुरुवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविकातुन मुख्याध्यापक किरण जाधव यांनी स्पर्धेचा उद्देश मांडला.यावेळी क्रीडा ज्योत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.प्रत्येक तालुक्यातील एका खेळाडूने क्रीडा ज्योतीसह सहभागी झाले होते. नंतर प्रमुख पाहुणे यांना शाळेचा एमसीसी प्लाटून ने मानवंदना देऊन संचलन सादर केले.त्यांच्यासोबत सर्व तालुक्यातील आश्रम शाळा आपापल्या शाळेचे फलक घेऊन प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देत संचलन सादर केले यावेळी उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे,कुर्मदास सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादासाहेब साठे, संस्थेचे अध्यक्ष ॲड मिलिंदराव हरहरे,सचिव महेश हरहरे, नगरसेवक अजिनाथ माळी,नाना साठे,नगरसेविका अर्चना कानडे,राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष अनिता भांगे, रमेश थोरात,मधुसूदन गायकवाड,शिवाजी जगदाळे,दिनेश जगदाळे,शहाजी चवरे,माढा तालुका क्रीडा समन्वयक संजय शिंदे,माढा तालुका शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष संजय यादव उपस्थित होते.स्पर्धा पार पाडण्यासाठी क्रीडाशिक्षक
0 Comments