श्री राजस्थानी विकास मंडळ, महिला शाखेतर्फे दि. 18, 19, व 20 डिसेंबर
रोजी " श्री गोदा ( आण्डाल) कथा....!
सचिव रूपाली राठी यांची माहिती.....!!
सोलापूर( कटू सत्य वृत्त): -संपूर्ण देश आणि विदेशामध्ये श्रीमद भागवत कथेच्या माध्यमातून जनजागृती करणारे व्याकरणाचार्य श्री१००८ युवराज स्वामीजी रामकृष्णाचार्यजी (इटारसी) यांची मधुर वाणीचा सोलापूरकरांना लाभ होणार आहे. या मधुर वाणीने || श्री गोदा ( आण्डाल) कथा || चे आयोजन दिनांक 18, 19 व 20 डिसेंबर 2023 रोजी महेश भवन गार्डन, प्रभाकर महाराज रोड, सम्राट चौक सोलापूर येथे सायं. 4 ते सायं. 7 पर्यंत करण्यात आल्याची माहिती संयोजिका रूपाली राठी यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत पुढे बोलताना राठी म्हणाल्या की, " सोलापूरकरांसाठी हा योग बऱ्याच वर्षातून आलेला असून हा योग युवराज स्वामीजी रामकृष्णचार्याजी यांचे शिष्य रवींद्र रामविलास काबरा (सांगली) यांच्या सहकार्य आणि समन्वय यातून आलेला आहे. वेळीअभय भुतडा फाउंडेशनचे अध्यक्ष अक्षय भुतडा यांनी देणगी देऊन यजमानपद स्वीकारले आहे.
श्री राम कृष्ण चार्य स्वामीजींना त्यांचे गुरु वडील श्री स्वामीजी सुदर्शनाचार्य महाराज यांनी गुरुपौर्णिमा 2007 रोजी आपला उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केले. आणि त्यांना व्याकरणाचार्य ही उपाधी सन्मानाने बहाल केली. आपल्या गुरुंनी दाखवलेल्या सदविचाराच्या पदचिन्हावर चालत राहून युवराज स्वामीजींनी संपूर्ण देश विदेशामध्ये श्री रामानुज सिद्धांत चा प्रचार करून श्रीमद् भागवत कथा व राम कथा इत्यादीच्या माध्यमातून संपूर्ण देशभर जनजागृती केली . आजही करत आहेत. त्यांच्या मधून वाणीचा लाभ आपल्या सोलापूर शहरात भव्य व ऐतिहासिक आयोजनाद्वारे करण्यात येत आहे. त्यांच्या मधुर वाणीचे श्रवण करण्याची सुवर्णसंधी एक दुग्ध-शर्करा योग सोलापूर शहरवासीयांना मिळणार असल्यामुळे या मधुर वाणी चे श्रवण करण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्षा सविता जोशी, संयोजिका नंदा करवा, आणि रूपाली राठी यांनी श्री राजस्थानी विकास मंडळ महिला शाखेच्या वतीने केले आहे.
या पत्रकार परिषदेला नीता जाजू, स्मिता मंत्री, आणि मंजु तोष्णीवाल आदी सह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.तसेच राजू राठी, कल्पेश मालु हे उपस्थित होते

0 Comments