जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करा... अन्यथा 14 डिसेंबर रोजी
राज्यव्यापी बेमुदत संप....!
संपात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन.....!!
सोलापूर (कटू सत्य वृत्त): -सरकारच्या निष्क्रिय धोरणामुळे आमच्या हक्काची पेन्शन योजना सरकार देण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे ही हक्काची पेन्शन योजना तात्काळ लागू करावी यासाठीच ही अस्तित्वाची लढाई राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना लढत असून दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारलेला असून हा बेमुदत संप यशस्वी करण्यासाठी सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व खातेनिहाय संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी या बेमुदत संपात सक्रिय सहभागी होऊन संप यशस्वी करण्याचे आवाहन संघटनेचे नूतन धडाडीचे अध्यक्ष विजय भांगे आणि सरचिटणीस राजाभाऊ सोनकांबळे यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत केले.
पत्रकार परिषदेत पुढे बोलताना अध्यक्ष भांगे म्हणाले की, " राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गेल्या अनेक वर्षापासून राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना काम करत असून या संघटनेच्या माध्यमातून राज्यातील तमाम सरकारी कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सातत्याने संघटना प्रयत्नशील आहे.
सरकार सुद्धा सध्या ॲक्टिव मूड वर आहे. तरी परंतु 2005 पासून हक्काच्या पेन्शन पासून कर्मचाऱ्यांना वंचित ठेवण्याचे पाप सरकार करत आहे. पेन्शन हाच कर्मचाऱ्यांचा वर्धापकाळातील मुख्य आधार असल्यामुळे तो आधार सरकार हिरावून घेऊ शकत नसल्यामुळेच तमाम कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन आपला आवाज बुलंद केला तरच सरकार आपल्या मागण्या मान्य करेल.
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्या: -
* नवीन (NPS) पेन्शन रद्द करून जुनी (OPS) पेन्शन योजना तात्काळ लागू करावी.
* कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा कायमस्वरूपी नियमित करणे.
* सर्व खात्यातील रिक्त पदे तात्काळ भरणे.
* विनाअट अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देणे.
* कंत्राटीकरण धोरणाचे उच्चाटन करणे.
* अनुशेषा अंतर्गत असलेले पदोन्नती तत्काळ देणे.
* चतुर्थ श्रेणी कर्मचारी व वाहन चालक पद भरती वरील बंदी उठवणे.
* शिक्षण क्षेत्रातील दत्तक योजना चालू करणे.
* समूह शाळा योजना द्वारे शाळांचे होणारे कार्पोरेट धार्जिने खाजगीकरण रद्द करणे.
* नवीन शिक्षण धोरणाचा पुनर्विचार करणे.
* 5 व्या वेतन आयोगापासूनच्या वेतन त्रुटी दूर करण्यासाठी यंत्रणा स्थापित करणे.
* सेवानिवृत्तीचे वय 60 करणे व इतर प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या मागण्या सरकारने त्वरित लागू कराव्यात.
या सर्व मागण्यांचे निवेदन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने सरकारकडे पोचवले असून राज्य सरकारी, निमसरकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती यांच्या आदेशानुसार दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी बेमुदत संप पुकारण्यात आला असून या संपामध्ये तमाम कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने अध्यक्ष विजय भांगे यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेला सरचिटणीस राजाभाऊ सोनकांबळे, कार्याध्यक्ष सी. एस .स्वामी, खजिनदार हुसेनबाशा मुजावर, राजेंद्र गिड्डे, बाळकृष्ण पुतळे, प्रमुख संघटक आशुतोष नाटकर, प्रभाकर माने, बसवराज मोटे, श्रीनिवास शेळके, जनार्दन शिंदे, बापू सदाफुले, सचिन मायनाळ आदी सह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

0 Comments