Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयात "जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील करिअर संधी"व्याख्यान संपन्न

 लोकमंगल कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालयात  "जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील करिअर संधी"व्याख्यान संपन्न


सोलापूर (कटुसत्य वृत्त):  श्रीराम ग्रामीण संशोधन आणि विकास संस्था संचालित लोकमंगल कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात "जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील करिअर संधी " या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.  या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी ओंकार चिंतलवाड (एम. एस. सी. अन्नतंत्रज्ञान) हे लाभले होते. यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी संवादकौशल्य, भाषाकोशल्य, नेतृत्वविकास, लेखनकोशल्य विकसित करण्यावर भर दिला पाहिजे. त्यांनी विद्यार्थ्यांना कृषी जैवतंत्रज्ञान व अन्नतंत्रज्ञान या शाखेबदल माहिती दिली तसेच या क्षेत्रात एम एस. सी. कृषी जैवतंत्रज्ञान, अन्नतंत्रज्ञान, जैवरासायनशास्त्र, सुक्ष्मजीवशास्ञ यासारख्या अनेक उच्चशिक्षणाच्या संधी आहेत असे मार्गदर्शन केले. उच्चशिक्षण झाल्यानंतर जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांना औषधनिर्माण कंपन्या, राष्ट्रीय बियाणे कंपन्या वनस्पती उतीसंवर्धन प्रयोगशाळा याठिकाणी शास्त्रज्ञ, तांत्रिक अधिकारी, याचबरोबर महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून कृषी अधिकारी, कृषी सहायक यामध्ये असलेल्या करियरच्या संधी तसेच कृषी आधारीत कृषी सेवा केंद्र, फळप्रक्रिया उद्योग, कृषी विपणन यासारख्या व्यवसायाच्या विविध संधी यांची माहिती दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रदीप आदलिंगे हे लाभले होते. प्रा सागर महाजन यांच्या आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास  प्रा.आशिष सरकाळे, प्रा.  पूनम उंबरे, प्रा.नंदकिशोर खुने, प्रा. सायली बडेकर, प्रा. वर्षा मानेदेशमुख तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments