Hot Posts

6/recent/ticker-posts

महाएनजीओ फेडरेशनच्या सोलापूर जिल्हा समन्वयकपदी महेश कासट यांची निवड

 महाएनजीओ फेडरेशनच्या सोलापूर जिल्हा समन्वयकपदी महेश कासट यांची निवड

सोलापूर(कटूसत्य वृत्त):- श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट यांची महाएनजीओ फेडरेशनच्या सोलापूर जिल्हा समन्वयकपदी निवड करण्यात आली आहे.

         महाएनजीओ फेडरेशन पुणे अंतर्गत फेडरेशनचे संस्थापक तथा महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे नवनिर्वाचित अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्या हस्ते महेश कासट यांना सोलापूर जिल्हा समन्वयकपदाचे नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. या  कार्यक्रमात महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यातील 55 जिल्हा समन्वयक उपस्थित होते. संस्थापक शेखर मुंदडा यांनी जिल्हा फेडरेशनचे समन्वयकाची  जबाबदारी, ध्येय व उद्दिष्टे आणि समाजात कोणत्या पद्धतीने महाएनजीओ फेडरेशनची वाटचाल असली पाहिजे यावर मार्गदर्शन केले.

      सुरुवातीला महाएनजीओ फेडरेशनचे संचालक अमोल उंबरजे यांनी फेडरेशन अंतर्गत स्वयंसेवी संस्था, कार्यकर्ते व सजग नागरिक यानां सोबत घेऊन संघटीत समाज कार्य करणारी शिखर संस्था आहे. २५०० सामाजिक संस्थांची शिखरed संस्था म्हणजे महा एनजीओ फेडरेशन संस्था आहे या प्रास्तविक केले. तर गणेश बाकले यांनी महा एनजीओ फेडरेशनबाबत मार्गदर्शन केले. अक्षय महाराज भोसले यांनी शासकीय योजना तळागाळापर्यंत कसे पोहोचवता येतील याची माहिती दिली. योगेश बजाज यांनी समन्वय साधला व मुकुंद शिंदे यांनी आभार मानले.

Reactions

Post a Comment

0 Comments