दयानंद विधी महाविद्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन
संविधान दिनाचे औचित्य साधून डी.जी.बी.दयानंद विधी महाविद्यालयात
आयोजित रक्तदान शिबीरात ५० रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला.
सोलापूर(कटूसत्य वृत्त):-डी.जी.बी. दयानंद विधी महाविद्यालय येथे भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून शनिवार दि. २५ नोव्हेंबर रोजी महाविद्यालयाच्या आवारात भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.या रक्तदान शिबिरात महाविद्यालयातील आजी व माजी विध्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला.डॉ.हेडगेवार रक्तपेढी संस्था सोलापूर संचलित डॉ.हेडगेवार रक्त केंद्र सोलापूर यांच्या सहकार्याने हा शिबिर घेण्यात आला.
याशिबिरात रक्तपेढी संस्थेच्या वतीने प्रत्येक रक्तदात्यास कृतज्ञता प्रमाणपत्र देण्यात आले.तसेच एच.डी.एफ.सी. बँक व विधी महाविद्यालयाच्या वतीने प्रत्येक रक्तदात्यास सहभाग प्रमाणपत्र व संविधानाचे प्रत देऊन गौरविण्यात आले.यावेळी दयानंद विधी महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ.सोनाली गायकवाड,प्रा.दंतकाळे,प्रा.आडसकर,प्रा.हिंगमीरे,प्रा.होटकर,प्रा.काकडे, प्रा.चलवादी,प्रा.देडे आदींची उपस्थिती होती.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रा.अरविंद देडे, .अंकलगी,प्राविण्य सलगर, शाम आडम,चैतन्य केंगार,क्रांती सुरवसे, स्नेहा पवार,केतकी शिंदे,विश्वनाथ मुडके,वीर रणशृंगारे,चेतन महाजन आदींनी परिश्रम घेतले.
0 Comments