Hot Posts

6/recent/ticker-posts

इच्छा भगवंताची परिवाराच्या उरूस निमित्त आयोजित सर्वपक्षीय नेत्यांनी झोडलेली स्नेह भोजनाची मेजवानी सध्या सोलापूर शहरासह जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठ्या चवीने चर्चिली जाऊ लागली आहे

 इच्छा भगवंताची परिवाराच्या उरूस निमित्त आयोजित सर्वपक्षीय नेत्यांनी

 झोडलेली स्नेह भोजनाची मेजवानी सध्या सोलापूर शहरासह जिल्ह्यातील

 राजकीय वर्तुळात मोठ्या चवीने चर्चिली जाऊ लागली आहे

सोलापूर(कटूसत्य वृत्त):-आपल्या राजकीय क्षेत्रातील दबदबा आणि सर्वपक्षीय राजकीय व्यक्तींशी असलेला स्नेह नेहमीच विविध कार्यक्रमातून सोलापूर महानगरपालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते किसन जाधव यांच्या विविध कार्यक्रमातून जाणवतो आता चक्क इच्छा भगवंताची परिवाराच्यावतीने सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षीही श्री पठाण शहावली दर्गा उरुस कार्यक्रमानिमित्त इच्छा भगवंताची फार्म हाऊस जाई जुई नगर येथे शुक्रवारी सायंकाळी स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते या स्नेहभोजनात सर्वपक्षीय नेत्यांनी जोडलेली स्नेहभोजनाची मेजवानी सध्या सोलापूर शहरासह जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या चवीने चर्चिली जाऊ लागला आहे. या स्नेहभोजनास सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, विविध संघटना, विविध क्षेत्रातील प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, माध्यम प्रतिनिधी यांच्यासह अन्य क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती देखील यावेळी लक्षणीय होती. सालाबाद प्रमाणे यंदाही तितक्याच उत्साहाने हा उरूस कार्यक्रम ईच्छा भगवंताची परिवाराचे सर्वेसर्वा लक्ष्मण मामा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली माजी गटनेते किसन जाधव, माजी नगरसेवक नागेश गायकवाड, अनिल जाधव, चेतन गायकवाड यांनी स्नेहभोजनास येणाऱ्या मान्यवरांचे स्वागत केले. राजकीय दबदबा आणि राजकीय व्यक्तींशी असलेला स्नेह नेहमीच विविध कार्यक्रमातून किसन जाधव यांनी आपला सर्वपक्षीय असलेला राजकीय संबंध या माध्यमातून त्यांनी दाखविले. राजकीय मतभेद वेगळे व कौटुंबिक जिव्हाळा नाती हे महत्त्वाचे आहेत त्याचाच प्रत्यय या उरूसच्या निमित्ताने पुढे आला. इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने आयोजित या स्नेह भोजन कार्यक्रमास मोहोळचे आमदार यशवंत माने, दक्षिण सोलापूर तालुक्याचे माजी आमदार दिलीप माने, सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त मोरे, राष्ट्रवादी प्रदेश सचिव संतोष पवार,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे, शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष भारत जाधव, मनीष काळजे, माजी गटनेते आनंद चंदनशिवे, उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना शहर प्रमुख मनोज शेजवाळ, माजी महापौर सुशीलाताई आबुटे,माजी नगरसेवक गणेश पुजारी, बाबा मिस्त्री, देवेंद्र कोठे, उमेश गायकवाड, तोफिक शेख, पीर अहमद शेख, नगरसेविका सौ सुनीता रोटे, संगीताताई जाधव, लताताई फुटाणे, उद्योजक कुमार करजगी, भाजपाचे ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नु, सोलापूर शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सुहास कदम, जुबेर बागवान, कबड्डी असोसिएशनचे मदन गायकवाड व त्यांचे संचालक मंडळ,नगरसेवक इनामदार, प्रशांत बाबर, आनंद मुस्तारे,महेश निकंबे, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांचे स्वागत जाधव परिवाराच्या वतीने यावेळी करण्यात आले. इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने आयोजित या उरुस कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या परिसरात यात्रेचे स्वरूप आले होते तर या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजन कार्यक्रमासाठी इच्छा भगवंताची परिवाराचे सदस्य, गायकवाड व जाधव परिवाराच्या सदस्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.


Reactions

Post a Comment

0 Comments